मुक्तपीठ टीम
पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचं पुत्रप्रेम शिवसेनेला भोवलं आहे. शिवसेनेनं पाच जागी विजयी होत असतानाच वणईची हातची जागा अपमानास्पदरीत्या गमावली आहे. तिथं शिवसेनेचे सदस्य सुशिल चुरी यांचा हक्क डावलून गावितांनी हट्टानं त्यांचा मुलगा रोहितसाठी उमेदवारी मिळवली होती. पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्यात यशस्वी ठरलेले गावित मतदारांना पटवण्यात अयशस्वी ठरले आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या जागा १८वरून २० झाल्या आहेत. मात्र, त्याचवेळी गेल्या निवडणुकीत जिंकलेली जागा गमवावी लागली आहे.
शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह पालघरमध्ये जोर लावला होता. त्यांनी उमेदवारही कामाची माहिती घेऊन निवडले होते. अपवाद झाला तो वणईचा. तेथे खासदारांनी थेट पक्ष नेतृत्वाकडून हट्टानं तिकीट मिळवलं. मात्र, मतदारांनी उमेदवारातील बदल साफ नाकारला. शिवसेनेची थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. खासदार पुत्रालाच उमेदवारी देण्याचा हट्ट नडला, अशी चर्चा आहे. खासदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावित ला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. खासदारांप्रमाणेच नेत्यांनीही जोर लावल्यानंतरही सेनेने हातची जागा गमावली आहे.
- तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर भाजपाचे पंकज कोरे प्रथम क्रमांकाची मते मिळवून विजयी झाले आहेत.
- या मतदारसंघाप्रमाणेच आणखीही दोन जागा शिवसेनेने चुकीच्या उमेदवार निवडीमुळे गमावल्याची चर्चा आहे.
पालघर जिल्हा परिषद १५ गट उमेदवार प्रमुख लढती
तलासरी
- उधवा-अक्षय दवणेकर-माकप (विजयी)
- नरहरी निकुंभ-भाजप(पराभूत)
डहाणू
- बोर्डी-ज्योती पाटील-भाजप(विजयी)
- उन्नती राऊत-राष्ट्रवादी(पराभूत)
- कासा-लतिका बालशी-राष्ट्रवादी(विजयी)
- कामिनी शिंदे-भाजप(पराभूत)
- सरावली- सुनील माच्छी-भाजप(विजयी)
- रडका कलांगडा-माकप(पराभूत)
- वणई-पंकज कोरे-भाजप(विजयी)
- रोहित गावित-शिवसेना
- विराज गडग-राष्ट्रवादी
- वर्षा वायडा-काँग्रेस
वाडा
- गारगाव- शेलार-राष्ट्रवादी(विजयी)
- नीलम पाटील-शिवसेना(पराभूत)
- मोज-अरुण ठाकरे-शिवसेना(विजयी)
- अतिष पाटील-भाजप
- मांडा- अक्षता चौधरी-राष्ट्रवादी(विजयी)
- राजेंद्रकुमार पाटील-भाजप
- पालसई- मिताली बागुल-शिवसेना(विजयी)
- धनश्री चौधरी-भाजप
- आबीटघर- भक्ती वलटे-राष्ट्रवादी(विजयी)
- दिव्या म्हसकर-शिवसेना
पालघर
- सावरे-विनया पाटील-शिवसेना(विजयी)
प्रांजल पाटील-बविआ - नंडोरे-नीता पाटील-शिवसेना(विजयी)
अनुश्री पाटील-भाजप
मोखाडा
आसे-हबीब शेख-अपक्ष(विजयी)
जयराम मिसाळ-भाजप
पोशेरा-सारिका निकम-शिवसेना(विजयी)
किशोरी गाटे-भाजप
विक्रमगड
15)आलोंडे-
संदीप पावडे-भाजप(विजयी)
विपुल पाटील-राष्ट्रवादी
पालघर जिल्ह्यातील पंचायत समितींच्या 14 जागांचे निकाल
डहाणू
1ओसारविरा -स्वाती राऊत,,राष्ट्रवादी
2सरावली-अजय गुजर,,भाजप
वाडा
3सापने-दृष्टी मोकाशी,,शिवसेना
पालघर
4नवापूर- मिलिंद वडे ,,राष्ट्रवादी
5सालवड- स्वाती पाटील ,,भाजप
6सरावली(अवधनगर) -ममता पाटील,शिवसेना
7 सरावली -रेखा सकपाळ-भाजप
8 मान-तृप्ती पाटील ,,मनसे
9 शिगाव- अनिल काठ्या ,बविआ
10 बऱ्हाणपूर- किरण पाटील,,शिवसेना
11 कोंढाण-कमलाकर अधिकारी ,,शिवसेना
12 नवघर/घाटीम-कामिनी पाटील,,शिवसेना
वसई
13 भाताने-बविआ
14 तिल्हेर-बविआ
भाजप 2 जागा वाढल्या
मनसे 1 जागा कमी
शिवसेना 1 कमी