Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ब्राह्मण समाजाने केंद्र सरकारच्या १० टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा”: रामदास आठवले

मुंबई महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजातील इच्छुकांना रिपब्लिकन पक्ष उमेदवारी देणार

October 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramdas athvle

मुक्तपीठ टीम

दलितांना आरक्षण मिळते मात्र आम्हाला आरक्षण मिळत नाही अशी भावना ब्राह्मण मराठा सवर्ण जातींमध्ये होती. त्या कारणानेही दलितांवर अत्याचार होत होते. त्यामुळे ब्राह्मण मराठा आणि सवर्णांमधील गरिबांना ज्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या आता आहे या आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी मी सर्वात आधी मागणी केली होती. सर्वच ब्राह्मण श्रीमंत नाहीत. ब्राह्मणांमध्ये गरिबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सवर्णांमधील गरिबांसाठी शिक्षण आणि नोकरी मध्ये १० टक्के सवर्णांना आरक्षण देणारा केंद्र सरकार चा कायदा ३ वर्षांपूर्वी केला आहे.त्या कायद्याचा लाभ ब्राह्मण समाजातील गरिबांनी घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

 

ब्राम्हण समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे आणि मुंबईत परप्रांतीयांना संविधानाचे संरक्षण मिळवून देणारे संघर्षनायक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ब्राम्हण समाजातर्फे समाज पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 

ताज महाल हॉटेल च्या बॉल रूम मध्ये ब्राह्मण एकता मंच; परमार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळ्यास ना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीतील खुसखुशीत भाषणाने सत्काराला उत्तर दिले. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांचा ना. रामदास आठवले यांच्या हस्ते ब्राम्हण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष ब्राह्मण समाजातील उमेदवारांना ५ जागांवर रिपाइंची उमेदवारी देणार असल्याची घोषणा यावेळी रामदास आठवले यांनी केली.

 

उत्तर प्रदेशातून ब्राम्हण आणि सर्व जाती चे लोक मुंबईत येऊन राहिले. मिळेल ते काम करून कष्ट करीत राहिले. त्यातील काही लोक व्यापारी बिल्डर उद्योजक आणि काही उच्च शिक्षित झाले. मात्र मध्यंतरी मुंबईत काही लोकांनी उत्तर प्रदेशातील लोकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी धमकी दिली. तेंव्हा सर्वात आधी माझ्या रिपब्लिकन पक्षाने ईट का जवाब पत्थरसे देंगे असा प्रति ईशारा देऊन उत्तर प्रदेशातुन मुंबईत आलेल्या बांधावांना पाठिंबा दिला होता याची आठवण यावेळी रामदास आठवले यांनी केली.

 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशात कुठेही उद्योग धंदा नोकरी आणि वास्तव्य करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना दिला आहे. उत्तर प्रदेशातून आलेल्या ब्राम्हण आणि सर्व जातींना मुंबईत राहण्याचा अधिकार आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांना विरोध केला नाही. ब्राह्मण आणि सवर्ण समाजातील ज्या लोकांच्या मनात जातीभेदाचा विचार आहे तो विचार त्यांचे प्रबोधन करून नष्ट केला पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून आज ब्राम्हण समाजातर्फे सत्कार स्वीकारताना सर्व समाजात परिवर्तन होत असल्याचा विश्वास वाटत आहे. दलित सवर्ण ब्राम्हण यांतील सामाजिक भेदभाव मिटत आहे. समाजात एकोपा निर्माण होईल डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता प्रस्थापित होईल त्या दिशेने आपली वाटचाल असावी असे आवाहन यावेळी रामदास आठवले यांनी केले. ब्राह्मनोने देश को जगा दिया है और नरेंद्र मोदी ने चीन पाकिस्तान को भगा दिया है बहुत सारे लोगोको हो रही है जलन क्यों की आरपीआय मे शामिल हुये है शुक्ला कृष्णमिलन अशी कविता सादर करून रामदास आठवले यांनी सभागृहात हास्याची कारंजी फुलविली.

 

यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला; ब्राम्हण एकता मंच चे अध्यक्ष शंभुनाथ मिश्रा, परमार्थ ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीप्रसाद पांडे, रिपाइंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास तायडे, संजय भिडे, ब्रिजमोहन पांडे, अशोक पांडे, प्रेमकुमार पांडे, सुरेश मिश्रा, कमलाकर मिश्रा, अनिल शुक्ला, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 


Tags: BJPBMC electionNarendra modiramdas athwaleRPIब्राम्हण समाजमुंबई महापालिकारामदास आठवलेरिपाइं
Previous Post

बलात्काऱ्याला १८ तासात अटक…५ दिवसात सुनावणी, २० वर्षे कारावासाची शिक्षा!

Next Post

पालघरमध्ये शिवसेनेला फायदा, पण खासदारांच्या पुत्रप्रेमामुळे हातची जागा गमावली!

Next Post
palghar

पालघरमध्ये शिवसेनेला फायदा, पण खासदारांच्या पुत्रप्रेमामुळे हातची जागा गमावली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!