मुक्तपीठ टीम
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येतातच भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला होता. त्याचे पडसाद आजही सभागृहात उमटल्याचे दिसले आहेत. नितेश राणे यांना म्याव म्यावचा आवाज चांगलाच भारी पडला आहे. नितेश राणेंना निलंबित करण्यासाठी शिवसेनाच्या नेत्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला आहे. त्यांच्या निलंबनाच्या मागणीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
जर कोणी वाईट बोललं तर खपवून घेणार नाही- सुहास कांदे
- आमदार सुहास कांदे यांनी हा विषय सभागृहात मांडला.
- त्यांनी सांगितलं की, आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली होती.
- त्यावर नितेश राणे यांनी पुन्हा आपण असं बोलणार असं म्हटलं आहे.
- हे खपवून घेतलं जाणार नाही.
- मोदींपेक्षा जरी आदित्य ठाकरे लहान असले तरी त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणं योग्य नाही.
- जर कोणी वाईट बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही, असं कांदे म्हणाले.
चुकीला माफी नाही-सुनील प्रभू
- यावेळी सुनील प्रभू यांनीही नितेश राणे प्रकरणावरून विरोधकांवर हल्ला चढवला.
- त्या दिवशी मी हा मुद्दा उपस्थित केला होता.
- तेव्हाही चर्चा झाली.
- तेव्हाही ठरलं नेत्यांबाबत नीट बोललं पाहिजे.
- चुकीला माफी नाही.
- त्यामुळे नितेश राणेंना निलंबित केलंच पाहिजे.
नितेश राणेंना कायमस्वरूपी निलंबित करा- भास्कर जाधव
- हा विषय अत्यंत गंभीर आहे.
- एखाद्या नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही.
- मी मोदींबद्दल बोललो.
- तेव्हा मी माफी मागितली.
- तुमच्यासाठी जसे मोदी आहेत.
- तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत.
- त्यामुळे नितेश राणेंना कायमस्वरुपी निलंबित करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.
सभागृहात माजला गोंधळ
- भास्कर जाधव हातावर हात मारून जोरजोरात आपलं म्हणणं मांडत होते.
- त्याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली.
- त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनीही जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली.
- हा गोंधळ अधिकच वाढल्याने अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.