मुक्तपीठ टीम
भाजपा आमदार नितेश राणे यांना ट्वीट चांगलेच भारी पडले आहे. आगामी मुंबई मनपा निवडणुकीची मोठी जबाबदारी नितेश राणेंवर आल्यावर ते आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट केले होते.यावर शिवसैनिक आक्रमक होत नितेश राणेंविरोधात मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
- भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी
- कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट केले होते.
- या ट्वीटसह त्यांनी फोटोदेखील पोस्ट केला.
- भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटचे पडसाद उमटले.
- नितेश राणे यांच्या ट्वीटमधील माहिती दिशाभूल करणारी असल्याचे अनेकांनी म्हटले.
तर, या फलकाच्या मुद्यावरून शिवसेनेवरही अनेकांनी टीका केली.
तमाम #हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSena चं नाव बदलणार का? @UdhavThakre @mybmc pic.twitter.com/kjh2LAVCQp
— nitesh rane (@NiteshNRane) December 22, 2021
नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल
- शिवसेनेने नितेश राणे यांच्या ट्वीटची दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी केली आणि ट्वीटरच्या माध्यमातून खोटी बातमी पसरवून दोन समाजात तेढ निर्माण केली आहे त्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
- नगरसेवक अरविंद भोसले यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
- भाजप आमदार नितेश नारायण राणे यांच्या ट्वीटरवरील बेताल वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भोईवाडा पोलिस ठाणे येथे निवेदन दिले.
- नगरसेवक अनिल कोकीळ यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नितेश राणे माफी मागण्यास तयार, पण…
- राणीबागेसंबंधी ट्वीट प्रकरणी शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,
- “कोणी कोणाच्या भावना दुखावल्या आहेत याबदद्दल विचार केला पाहिजे.
- हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेना कधी माफी मागणार? त्याबद्दल त्यांनी सांगावं.
- अशी निवेदनं त्यांनी देत राहावं. आम्ही पाहत राहावं असं काही आहे का?
- समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी”.