Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना विधवांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा: शरद पवार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Heramb Kulkari and sharad Pawar

मुक्तपीठ टीम

कोरोना एकल महिलांच्या रोजगारासाठी विविध योजना एकत्र करून बँकेमार्फत अर्थपुरवठा करण्याबाबत विचार करायला हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी व प्रतिमा कुलकर्णी यांनी मुंबईत भेटून त्यांना निवेदन दिले.त्यावेळी चर्चेत त्यांनी हे मत व्यक्त केले.

या महिलांना रोजगार देण्यासाठी व अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केल्यावर शरद पवारांनी संपूर्ण प्रश्न तपशीलवार समजून घेतला.महिलांच्या अपेक्षा समजून घेतल्या .यावेळी उपस्थित असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा केली.

महिलांच्या मालमत्ताविषयीचे कायदे असून उपयोग होत नाही. त्यामुळे त्यात सुलभीकरण होणे आवश्यक आहे अशी भावना समितीने व्यक्त केली.संजय गांधी निराधार योजनेत २१००० रु ची उत्पन्नाची अट ५०,००० रु पर्यंत वाढवायला हवी यासाठी लक्ष घालावे अशीही विनंती करण्यात आली.

 

त्यानंतर विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतल्यावर त्यांनी या महिलांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सांगितले. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना,बालसंगोपन योजना,५०,००० ची मदत मिळाली नाही अशा १८०० महिलांच्या जिल्हानिहाय याद्या कोरोना एकल महिला समितीच्या कार्यकर्त्यांनी मा.नीलम गोऱ्हे यांना दिल्या.त्या त्यांनी सर्व महसूल आयुक्तांना पाठवून १५ दिवसात या महिलांना योग्य ते लाभ मिळवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अशा रीतीने प्रत्येक महिलेच्या समस्येकडे त्या लक्ष घालत आहेत..त्यानंतर ज्या महिलांवर कर्ज आहे,अशा महिलांची स्वतंत्र माहिती घेऊन त्या अडचणींवरही मार्ग काढण्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन वात्सल्य समितीच्या बैठका नियमित व्हाव्यात म्हणून आढावा घेण्याची विनंती केली. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन वात्सल्य समितीला गती दिली जाईल असे सांगितले .त्याचप्रमाणे महिला कोणकोणते व्यवसाय करू शकतात याचा अभ्यास करून कर्ज धोरण ठरवायला हवे अशी महत्वाची सूचना केली.त्यासाठी महिला कोणते व्यवसाय करू शकतात याचे सर्वेक्षण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली


Tags: coronaHeramb Kulkarnimumbaisharad pawarwidowsकोरोनाकोरोना एकल महिला रोजगारमुंबईशरद पवारहेरंब कुलकर्णी
Previous Post

अटकपूर्व जामीनानंतर दरेकरांचा आरोप: “घोटाळ्यांचे आरोप करत असल्यानं माझ्यावर सूडबुद्धीनं कारवाई!”

Next Post

उत्तर सभा: राज ठाकरेंकडून काय अपेक्षा?

Next Post
Raj Thackeray Uttarsabha

उत्तर सभा: राज ठाकरेंकडून काय अपेक्षा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!