Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अटकपूर्व जामीनानंतर दरेकरांचा आरोप: “घोटाळ्यांचे आरोप करत असल्यानं माझ्यावर सूडबुद्धीनं कारवाई!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pravin Darekar mumbai Bank

मुक्तपीठ टीम

राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयकडून दिलासा मिळाला आहे. प्रवीण दरेकर यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अनेक वर्ष तपास सुरू आहे त्यामुळे अटकेची आवश्यकता नसल्याचं, उच्च न्यायालायने सांगितलं आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत. मी आघाडीवर घोटाळ्यांचे आरोप करत असल्यानं माझ्यावर सूडबुद्धीनं कारवाई केल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

 

प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याचा प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस कोठडीची कोणतीच गरज नव्हती. न्यायालयाने हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, असेही प्रवीण दरेकर यांच्या वकिलांनी सांगितले. प्रवीण दरेकर यांना अटक झाली तरी त्यांना बाँडवर सोडण्यात येईल, अशी माहिती अखिलेश चौबे यांनी दिली.दरेकरांना अटकपूर्वी जामीन मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीला धक्का असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

…तेवढे मी सरकारच्या कारभारावर ताशोरे ओढणारच!

  • आघाडी सरकारने राज्यात विरोधकांचा छळवाद मांडला आहे.
  • त्याचं चोख उत्तर न्यायालयाने दिलासा देऊन दिलं आहे. ज्या गोष्टीत तथ्य नव्हते.
  • गुन्हाही होत नव्हता.
  • पण जोरजबरदस्तीने गुन्हे दाखल केले होते.
  • कुंभाड रचलं होतं.
  • स्वत: सरकार त्यात हस्तक्षेप करत होते.
  • मी स्वत: पाहत होतो.
  • पण आपल्या देशात लोकशाही, संविधान मजबूत आहे.
  • मनमानी करता येत नाही.
  • न्यायालयाने मनमानीला जोरदार थप्पड लगावली आहे.
  • दरेकर यांचं तोड दाबण्याचा प्रयत्न होता.
  • पण जेवढे विरोध करतील तेवढे मी सरकारच्या कारभारावर ताशोरे ओढणारच, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

Tags: Mumbai Bankmumbai high courtMVApravin darekarप्रवीण दरेकरमहाविकास आघाडी सरकारमुंबई उच्च न्यायालयमुंबई बँक
Previous Post

नील किरीट सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post

कोरोना विधवांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा: शरद पवार

Next Post
Heramb Kulkari and sharad Pawar

कोरोना विधवांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा: शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!