Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“योगविद्येच्या प्रचारासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक मार्गदर्शक”: शरद पवार

डॉ. प्रज्ञा पाटील लिखीत ‘प्राण ते प्रज्ञा’ या पुस्तकाचे प्रकाशन

September 1, 2021
in सरकारी बातम्या
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्वज्ञान आहे. जगमान्य अशी योगसाधना सातत्याने केल्यास मानवी आयुष्याच्या अखेरपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत व उत्तमपणे राहण्यास मदत होईल. योगांचे विविध प्रकार व तंत्र आत्मसात करण्यासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे डॉ. प्रज्ञा पाटील लिखीत ‘प्राण ते प्रज्ञा’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार यांच्यासह सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार हिरामण खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पवार पुढे म्हणाले, योगविद्येच्या प्रसारासाठी उपयुक्त अशा या पुस्तकाचे इंग्रजी व हिंदीमध्ये भाषांतर केल्यास जास्तीत-जास्त वाचकांना याचा दैनंदिन आयुष्यात उपयोग करता येईल, असा सल्ला या पुस्तकास शुभेच्छा देतांना पवार यांनी दिला.

 

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले की, सर्वसामान्याला परवडेल असा योग हा व्यायामप्रकार असून याच्या नियमित साधनेने अनेक शारिरीक व्याधी दूर होण्यास मदत होते. प्राणायाम व योगासनामुळे श्वसन संस्थेतील सर्व इंद्रियांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होते. त्यामुळे सर्वानी आपल्या दैनंदिन आयुष्यात योगासने करावी. सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी या पुस्तकाचा नक्कीच हातभार लागेल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतत १०३ तास योग करण्याचा विक्रम केलेल्या डॉ. प्रज्ञा पाटील लिखित ‘प्राण ते प्रज्ञा’ या पुस्तकात प्राणायाम करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, प्राणायाम साधना कशी करावी, प्रकृती नुसार प्राणायाम, विद्यार्थ्यांचे शारिरीक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठीची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.

 


Tags: aditi tatkarechhagan bhujbalncp president sharad pawarpran te pradnyaआदिती तटकरेगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डछगन भुजबळडॉ. प्रज्ञा पाटीलप्राण ते प्रज्ञा
Previous Post

नेव्हल एव्हिएशनला मिळणार ‘प्रेसिडेंट कलर’ सर्वोच्च सन्मान! समजून घ्या नेव्हल एव्हिएशन…

Next Post

गॅस सिलिंडर पुन्हा महाग! आठ महिन्यात १९० रुपयांचा भडका!

Next Post
LPG

गॅस सिलिंडर पुन्हा महाग! आठ महिन्यात १९० रुपयांचा भडका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!