Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शरद पवारांचा किमान सहमती कार्यक्रम: “तुम्ही मोदींना हरवू शकता!”

September 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

लोकसभा निवडणुक २०२४साठी अजून दोन वर्षे बाकी आहेत, पण राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पण पंतप्रधान आणि भाजपाचे सर्वात मोठे ब्रँड नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून कोणाचा चेहरा लोकांसमोर मांडायचा, असा प्रश्न समोर आला की भाजपाविरोधकांचे ऐक्य फुटतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मात्र त्यावर चांगला उपाय शोधला आहे. त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजेच किमान सहमती कार्यक्रमाच्या अंतर्गत एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार मांडला आहे. त्यामुळे आधी भाजपा आणि मोदींचा पराभव आणि मग चेहरा ठरवला जाईल. पवारांचा हा फॉर्म्युला उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

शरद पवारांचा किमान सहमतीचा फॉर्म्युला…

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत मोठे विधान केले आहे.
  • त्यांनी म्हटलं की, “कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजेच किमान सहमती कार्यक्रमाच्या अंतर्गत एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार करता येईल.
  • विरोधकांनी एकत्र यायला हवे.
  • २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करण्याचा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे.
  • त्यांनी बनवलेल्या सूत्राचे पालन केले तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदी सरकारचा पराभव निश्चित आहे.

फोडाफोडी हेच भाजपाचे काम!

  • यासोबतच त्यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्या धोरणांवरही हल्लाबोल केला. २०१४मध्ये दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे आता सर्व विरोधी पक्षांनी सध्याच्या सरकारसमोर एकजूट दाखवायला हवी.
  • ते म्हणाले, “भाजपने पैशाचा आणि सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकमधील आमदार फोडले आहेत.
  • झारखंडमध्ये हाच प्रयत्न सुरू आहे. देशभरात हेच आहे. फोडाफोडी हेच भाजपचे कामाचे धोरण बनले आहे.”

कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत लढविणार!

  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीवर भर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मोदी सरकारचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल.
  • २०२४च्या निवडणुका कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत लढवण्याचा विचार करू शकतो, असेही ते म्हणाले.
  • छोट्या पक्षांना सत्तेतून बेदखल करणे हेच भाजपचे उद्दिष्ट आहे.
  • त्याचवेळी नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. वेगळे सरकार स्थापन केले. मी याचे स्वागत करतो. मात्र, विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक वेळा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढले होते.
  • यापुढे सत्तेची जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नाही.

Tags: BJPcommon minimum programLok Sabha Election 2024muktpeethNationalist Congress partyncp president sharad pawarprime minister narendra modiकॉमन मिनिमम प्रोग्रामघडलं-बिघडलंपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपमुक्तपीठराष्ट्रवादी काँग्रेस पक्षराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारलोकसभा निवडणुक २०२४
Previous Post

कॉपीराइट नसताना स्टडी मटेरियलचं वितरण, टेलिग्रामला न्यायालयानं खडसावलं!

Next Post

तेलंगणाचे मुख्यमंत्री बिहारमध्ये! केसीआर यांची भाजपमुक्त भारतची घोषणा!

Next Post
Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao

तेलंगणाचे मुख्यमंत्री बिहारमध्ये! केसीआर यांची भाजपमुक्त भारतची घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!