मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज विरोधी पक्षांच्या नेत्यांसमवेत बैठक घेणार आहेत. आम आदमी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच अन्य काही पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली ही चर्चा होणार आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे मुंबईनंतर दिल्लीतही शरद पवार यांना भेटले आहेत. त्यानंतर होत असलेल्या या बैठकीतून राष्ट्रीय राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल, अशी चर्चा आहे.
शरद पवारांची ‘राष्ट्रमंच’ बैठक का महत्वाची?
• शरद पवार यांनी आयोजित केलेली ही बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याच्या दिशेने फार महत्वाची मानली जात आहे.
• निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी पवारांची दिल्लीत बैठक झाली, या बैठकीनंतर चर्चेला उधाण आले आहे.
• या महिन्यात शरद पवारांशी प्रशांत किशोरांची ही दुसरी बैठक आहे.
• शरद पवारांनी बैठक आयोजित केल्यामुळे भाजपाविरोधी राजकारण करणारे देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक नेते उपस्थित राहत आहेत.
‘राष्ट्रमंच’ बैठकीस कोण असणार?
• शरद पवार, फारुख अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, पवन वर्मा, संजय सिंह, डी राजा, न्यायमूर्ती एपी सिंह, जावेद अख्तर, केटीएस तुळसी, करण थापर आशुतोष, अॅड. मजीद मेमन, खासदार वंदना चव्हाण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी, केसी सिंह, संजय झा, सुधींद्र कुलकर्णी, कॉलिन गोन्साल्वेस, अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमार, घनश्याम तिवारी आणि प्रीतीश नंदी यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेते आणि प्रख्यात लोक हे बैठकीस उपस्थित असतील.
• महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याविषयी माहिती दिली आहे.
• नवाब मलिक म्हणाले की, आगामी लोकसभा अधिवेशन आणि देशातील वर्तमान राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा होईल.
‘राष्ट्रमंच’ नाव कुठून आले?
• ‘राष्ट्रमंच’ याच बॅनरखाली भाजपाविरोधात नेत्यांची याआधीही बैठक झाली आहे.
• भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘राष्ट्रमंच’ची ती बैठक आयोजित केली होती.
• त्यांनी आयोजित केलेल्या आधीच्या बैठकीत काही बुद्धिमंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
• आधीच्या बैठकीत उपस्थितांपैकी खासदार संजय सिंह, प्रा. अरुणकुमार ‘राष्ट्रमंच’च्या आधीच्या बैठकीत होते. शत्रुघ्न सिन्हाही उपस्थित राहण्याची शक्यता आहे