मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावर शरद पवार यांनी आपल्या अमरावती दौऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेतृत्व चुकीचे असले तर त्याची किंमत कामगारांना चुकवावी लागते. घरावरच्या हल्ल्यात कामगारांचा दोष नाही, नेतृत्व चुकीचं असलं की असं होतं. सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना काही लोकांनी भडकवले, असा आरोप करत पवार म्हणाले की,”राज्य आमच्या हाती आल्याने एक वर्ग अस्वस्थ!!” झाला आहे. तसं बोलताना त्यांचा रोख भाजपावरच असल्याचं मानलं जातं.
राज्य आमच्या हातात आलं म्हणून एक वर्ग अस्वस्थ!
- राज्य आपल्या हातात आले, पण राज्य त्यांच्या हातात राहील नाही म्हणून एक वर्ग अस्वस्थ आहे.
- देशातील सत्तेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार संकटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.
- सतत काही ना काहीही करुन आघाडीतील तिन्ही पक्षाला त्रास दिला जातोय.
- मात्र शेवटी आपली सामुहिक शक्ती तयार केली तर हे प्रयत्न हानून पाडू.
आंदोलनाचा दोष कर्मचाऱ्यांना नाही! चुकीच्या नेतृत्वाचा!!
- गेले ४० वर्षे एसटी कर्मचाऱ्यांसाठी काम केले.
- कालच्या घरावरच्या हल्ल्यात कामगारांना दोष नाही, नेतृत्व चुकीचं असलं की असं होतं, सैनिकही चुकीच्या दिशेला जातात.
- सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना काही लोकांनी भडकवलं.
- तसेच नरसिंहराव यांच्या काळात दंगली झाल्या.
- दंगली नंतर मी महाराष्ट्रात आलो तेव्हा दंगली झालेल्या भागात मी जायचो.
- तेव्हा हिंदू- मुस्लीम दंगल घडवण्याचा डाव होता.
- तेव्हा शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई शहर सुरळीत सुरु केलं होतं.
- अशी संकट येतात त्यातून सावरावं लागत आहे.
- तसेच खिलारीला भुकंप झाला तेव्हा ८०० लोक मृत्यूमुखी पडले होते, मोठं संकट आलं होतं.
- त्या संकटाच्या काळातंही सावरलं.
- एका महिन्यात प्रत्येकाची घरं बांधून दिली.
- संकट आल्यावर घाबरुन जायचं नसतं त्याला तोंड द्यायचं असतं, कालचं संकट काही संकट नाही.
- त्याला महत्त्व द्यायचं नाही.
काश्मीर फाईल्स चित्रपटातील घटनेवेळी भाजपाच्या पाठिंब्याने व्हीपी सिंग सरकार!
- तसेच काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले होते.
- आता एका चित्रपटात हिंदूंवर अत्याचार कसा होतो हे दाखवले.
- काश्मीर फाईल चित्रपट बघितला पाहिजे असं आवाहन केंद्र सरकरने केलं.
- तेव्हा देशात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होतं त्याला भाजपचा पांठिबा होता.
- याला भाजपा जबाबदार आहे.
- हे देशाच्या एकतेला सुरुंग लावण्याचं काम आहे.
- याविरोधात लोकांनी एकत्र यायला हवं.
- जातीयवाद, धर्मांच्या नावावर राजकारण करतात अशांच्या विरोधात उभं राहयचे.
- तसेच महागाई वाढत आहे.
- पेट्रोल-डिझेलच्या महागाईने सर्वत्र महागाई वाढते.
- देशात बेरोजगारी आहे.
- सरकार देशाच्या समोरच्या प्रश्नाला सहकार्य करत नाही.
- तसेच कुणी राज्या-राज्यात संघर्ष निर्माण करत असेल तर एकत्र यायला हवं.