Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट आणि नील सोमय्या आहेत कुठे? बनावट पुराव्यांचा प्रयत्न! राजभवनने तसे करु नये!! – संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut vs kirit somaiya

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सकाळीच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर विक्रांत वाचवण्यासाठीच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपांचे क्षेपणास्त्र सोडले आहे. भाजपा आता सोमय्या कुठे आहेत, ते का सांगत नाही, असा प्रश्न विचारत त्यांनी सोमय्यांना वाचवण्यासाठी बनावट पुरावे तयार केले जात असल्याचा आरोप केला. राजभवनात जुन्या तारखांनी बनावट नोंदी तयार करण्याच्या काहींचा प्रयत्न आहे. राजभवनने तसे करू नये, तसे केले गेले तर राजभवनची उरली-सुरली अब्रूही धुळीस मिळेल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

 

किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित ?

— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2022

सोमय्यांवर राऊतांचे आरोपांचे क्षेपणास्त्र

आर्थिक गुन्हे शाखा जबाब नोंदवणार!

  • विक्रांतला वाचवण्याच्या नावावर मोठा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी सेव्ह विक्रांत मोहीम चालवत संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून पैसा गोळा केला आहे.
  • हा संपूर्ण घोटाळा खूप मोठा आहे. त्यामुळेच या घोटाळ्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. माझ्या मते उद्यापासून जबाब नोंदवण्यास सुरुवात होईल.

 

भाजपाने सांगावे कुठे आहेत सोमय्या बाप-बेटे?

  • माझा प्रश्न भाजपाला आहे, हे दोघे बाप-बेटे गेलेत कुठे आहेत? ते गेले तरी कुठे? कुठे गायब झालेत? भाजपाचे नेते काहीच का बोलत नाहीत? जनतेचा पैसा, देशाचा पैसा लुटून नेला आहे.

 

राजभवनने जुन्या नोंदी करु नये…

  • या दोघांचे अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरु आहेत. जामीन मिळाला तरच हे पुढे येतील.
  • ते होत नसल्याने ते गायब आहेत. ते परदेशातही पळू शकतात.
  • त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करणे गरजेचे आहे.
  • त्यांचे साथीदार बनावट पुरावे तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
  • माझा राजभवनला इशारा आहे, तुम्ही आता तसे काही करु नका. तुमची उरली-सुरली अब्रूही धुळीस मिळेल.
  • कारण खूप प्रयत्न सुरु आहेत.

 

मुंबई पोलीस पकडून आणतील!

  • मला खात्री आहे, मुंबई पोलीस हे आरोपी जेथे आहेत, तेथून त्यांना पकडून आणतील.
  • जनतेचा-देशाचा पैसा यांनी लुटला आहे.
  • तो वसूल केला जाईल.

Tags: BJPINS VikrantKirit SomaiyaNeil Somaiyasanjay rautआयएनएस विक्रांतकिरीट सोमय्यानील सोमय्याभाजपासंजय राऊत
Previous Post

बिरोबाच्या नावानं चांगभलं…एकच गजर आसमंतात! यात्रेला प्रचंड प्रतिसाद!

Next Post

शरद पवारांचा भाजपावर हल्ला बोल! “राज्य आमच्या हाती आल्याने एक वर्ग अस्वस्थ!!”

Next Post
Sharad Pawar

शरद पवारांचा भाजपावर हल्ला बोल! "राज्य आमच्या हाती आल्याने एक वर्ग अस्वस्थ!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!