Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. अशोक ढवळे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dr Ashok Dhawale

मुक्तपीठ टीम

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २३ वे राष्ट्रीय महाअधिवेशन नुकतेच पार पडले. काँग्रेस नेत्याने केलेल्या कम्युनिस्ट नेत्याच्या प्रशंसेमुळे चर्चेत आलेल्या या अधिवेशनात महाराष्ट्रासाठीही एक चांगला निर्णय झाला आहे. माकपच्या पॉलिटब्यूरो या सर्वोच्च समितीवर १७ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळेंचा समावेश आहे. तर अन्य तीन मराठी नेत्यांचीही केंद्रीय समितीवर निवड झाली आहे.

 

महाराष्ट्रातून केंद्रीय समितीवर ३ सदस्य

  • डॉ. अशोक ढवळेंची पॉलिट ब्युरोवर निवड झाली आहे.
  • ३ सदस्यांची ८५ सदस्यांच्या नवीन केंद्रीय कमिटीवर निवड करण्यात आली आहे.
  • पक्षाच्या या महाअधिवेशनात किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष व यापूर्वी ७ वेळेस निवडून आलेले आमदार जे. पी. गावित, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, पक्षाचे नवीन महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांची निवड केली आहे.

 

पॉलिट ब्युरोवर निवड होणारे तिसरे मराठी नेते!

  • पक्षातील सर्वोच्च अशा पॉलिटब्युरोवर निवड होणारे राज्यातील डॉ. ढवळे हे तिसरे नेते आहेत.
  • यापूर्वी राज्यातील बी. टी. रणदिवे व एम. के. पंधे यांनी पॉलिटब्युरोचे सदस्य म्हणून काम केले होते.
  • माजी आमदार नरसय्या आडाम यांनी वयाच्या ७५ वर्षे या अटीमुळे राज्य सचिवपदावरून निवृत्ती स्वीकारली.
  • त्यांच्या जागी राज्य सचिवपदी डॉ. उदय नारकर यांची नियुक्ती करण्यात आली.
  • पक्षाच्या नवीन केंद्रीय समितीवर माजी आमदार जीवा पांडू गावीत आणि मरियम ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली.

 

लाँग मार्चवरील पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन

  • पक्षाच्या अधिवेशनात २०१८ मध्ये निघालेल्या नाशिक ते मुंबई या सुमारे ४० हजार शेतकरी व आदिवासी बांधवांच्या ऐतिहासिक लॉंग मार्चवर आधारित ‘फार्मर्स ऑन द मूव्ह’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
  • राज्यातील या आंदोलनाची अधिवेशनात दखल घेण्यात आल्याचे राज्य किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
  • महाराष्ट्राच्या धर्तीवर देशात अन्यत्रही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करावा, असा ठराव करण्यात आल्याची माहितीही डॉ. नवले यांनी दिली.

Tags: CPIDr. Ashok Dhawalekeralकेरळडॉ. अशोक ढवळेमहाराष्ट्रमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
Previous Post

शरद पवारांचा भाजपावर हल्ला बोल! “राज्य आमच्या हाती आल्याने एक वर्ग अस्वस्थ!!”

Next Post

“पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार”

Next Post
Rajesh Tope at PIBM's Eleventh Graduation Ceremony

"पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!