Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मृद व जलसंधारणाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

February 16, 2022
in सरकारी बातम्या
0
Shankarrao gadak

मुक्तपीठ टीम

राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या बंधा-यांची कामे, साठा बंधारा दुरूस्ती, पाझर तलाव दुरूस्तीची कामे, नियोजीत लघु पाटबंधारे तलावासंदर्भातील प्रलंबित कामे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

            

मंत्रालयात मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या अनुषंगाने प्रलंबित कामांचा आढावा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी घेतला.

            

राहुरी- नगर- पाथर्डी येथील ४५ कामांपैकी ४ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या १७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील जे बंधारे वाहून गेले आहेत त्यांचे पुन्हा सर्वे करण्यासंदर्भात तसेच उर्वरीत कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्यासंदर्भात मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी याबाबत मंत्री शंकरराव गडाख यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा केली.

            

तसेच चर्चा करण्यात राहुरी- नगर- पाथर्डी येथील ४५ कामांपैकी ४ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या १७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. उर्वरीत कामांना लवकरच मान्यता देण्यासंदर्भात राज्यमंत्री तनपुरे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

            

अहमदनगर जिल्ह्यातील  कापुरवाडी येथील आडाचा दरा पाझर तलाव अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतक-यांना सिंचनासाठी अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या तलावाचा फुटलेला बांध तातडीने दुरूस्त करण्याबरोबरच त्यासाठी येणा-या खर्चास तातडीने मंजूरी देण्याचे निर्देश मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

             

सोलापूर जिल्ह्यात लघुपाटबंधारे योजनांची अंमलबजावणी करताना सांगोला तालुक्यातील मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. याचबरोबर  मोहोळ येथील शेतक-यांच्या जमिनींचे उर्वरित भूसंपादन करून त्यांना नियमानुसार मोबदला देण्यात यावा.  प्रलंबित तलावाच्या कामास गती द्यावी, असे निर्देश शंकरराव गडाख यांनी दिले.

            

पुणे जिल्ह्यातील मौजे खामगाव, रांजणे, कौडगाव, आंबेड, ओसाडे, निगडे, तालुका वेल्हा येथील मौजे कर्नावड, मौजे टिटेघर, मौजे वडतुंबी, कोर्ले व इतर योजनेसंदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देशही शंकरराव गडाख यांनी दिले.

             

बैठकीस मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, आमदार संग्राम थोपटे, आमदार शहाजी पाटील, आमदार यशवंत माने आदीसह अधिकारी उपस्थित होते.

 

ओवळा-माजीवाडा येथे बंधाऱ्याची दुरूस्ती व बांधणी करावी

मिरा-भाईंदर नदीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी खाडीत जाते. या पाण्याचा स्थानिकांना वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्यात यावा. ओवळा-माजीवाडा येथे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या येऊर हुमायुन बंधाऱ्याची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जलदगतीने दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले. मंत्रालयात मिरा-भाईंदर येथील बंधारा बांधकाम तसेच येऊर येथील बंधारा दुरूस्तीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, येऊर येथील हुमायून बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रस्ताव करून तो वन विभागास सादर करावा. जिल्हा नियोजन व विकास निधीमधून खर्च करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. ओवळा-माजीवाडा येथील ठाणे महानगरपालिका हद्दीतील येऊर हुमायून बंधाऱ्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुरूस्तीचे काम केल्यास त्याचा वन्य प्राण्यांनाही फायदा होईल. तसेच विशेष बाब म्हणून ८०० मीटरची संरक्षित भिंत बांधण्यात यावी.

 

 

याचबरोबर मिरा-भाईंदर नदीजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधुन येणारे पाणी साठवून महानगर पालिकेच्या हद्दीत उपलब्ध करुन दिल्यास तेथिल नागरिकांना त्याचा फायदा होईल. तसेच, अतिरिक्त पावसाच्या पाण्यामुळे चेना नदीचे पाणी खाडीत जाते त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही, मात्र, शेतीचेही नुकसान होते. या समस्या विचारात घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात यावे, असे निर्देशही शंकरराव गडाख यांनी दिले.

            

 

उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचा शोध घेत नागरीक वस्तीत यावे लागते, यामुळे अनेक दुर्घटना घडतात. या दुर्घटनांना आळा बसावा यासाठी वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बंधा-याची दुरूस्ती करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्यानुसार शंकरराव गडाख यांनी बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने करण्यासंदर्भात सूचना दिल्या. बैठकीस जलसंधारण विभागाचे अवर सचिव पाटील, सहसचिव दि.गा. प्रक्षाळे आदिसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Previous Post

रशियाचा युक्रेनवर थेट हल्ला नाही, तरीही प्रचंड घबराट! कारण सायबर हल्ला! रशियावर आरोप!

Next Post

राज्यातील गट सचिवांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘अकोला मॉडेल’ राबविण्याबाबत अभ्यासगट स्थापन – बाळासाहेब पाटील

Next Post
सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील गट सचिवांच्या समस्यांबाबत बैठक 1

राज्यातील गट सचिवांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘अकोला मॉडेल’ राबविण्याबाबत अभ्यासगट स्थापन - बाळासाहेब पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!