Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील गट सचिवांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘अकोला मॉडेल’ राबविण्याबाबत अभ्यासगट स्थापन – बाळासाहेब पाटील

February 16, 2022
in सरकारी बातम्या
0
सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील गट सचिवांच्या समस्यांबाबत बैठक 1

मुक्तपीठ टीम

राज्यातील विविध कार्यकारी संस्थांच्या गट सचिवांच्या समस्या सोडविण्यासाठी अकोला-वाशिम मॉडेल राबविण्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज येथे दिली.

          

 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील गट सचिवांच्या समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, चंद्रपूर, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहकारी संस्थांचे गट सचिव व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

          

 

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, सहकार चळवळीत गट सचिवांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर अकोला-वाशिम जिल्हा कृषी सहकारी पतसंस्था संघ अर्थात ‘अकोला मॉडेल’ राबविण्याबाबत सात सदस्यीय अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभ्यास गटाचा महिन्याभरात अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सहकारी संस्था/सोसायट्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

अकोला मॉडेलबाबत :       

अकोला-वाशिम जिल्ह्यांमध्ये विविध कार्यकारी संस्थांवर आणि गट सचिवांवर नियंत्रण रहावे, त्याचे नियमन होऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हावा यासाठी अकोला-वाशिम जिल्हा देखरेख सहकारी संस्था ज्या पद्धतीने काम करत होती त्याच धर्तीवर सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकार विभागाचे कामकाज सुलभ पद्धतीने होण्यासाठी जिल्हा कृषी सहकारी पतसंस्थांचा संघ जिल्हा देखेरेख सहकारी संस्थेला सामावून घेऊन निर्माण करण्यात आला. या संघाला सर्वस्तरावरुन मान्यता देण्यात आली. त्यामुळे गट सचिव आणि विकास संस्थांच्या कामकाजावर नियमन व नियंत्रण करणे शक्य झाले. तसेच गट सचिवांचे वेतन नियमित होऊन परिणामी गट सचिवांची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली. यामुळे कामकाजात गतीमानताही आली.


Tags: Balasaheb Patilसहकार मंत्री बाळासाहेब पाटील
Previous Post

मृद व जलसंधारणाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

Next Post

“शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अॅड. रुपनवर यांचा ‘जीवनसुगंध’ सर्वांना प्रेरणादायी ठरेल” – रामराजे नाईक निंबाळकर

Next Post
विधानपरिषदेचे माजी सदस्य अॅड. रामहरी रुपनवर यांनी लिहिलेल्या जीवनसुगंध या पुस्तकाचे प्रकाशन 1

"शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अॅड. रुपनवर यांचा ‘जीवनसुगंध’ सर्वांना प्रेरणादायी ठरेल" - रामराजे नाईक निंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!