Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

June 10, 2022
in सरकारी बातम्या
0
pohradevi Development Plan

मुक्तपीठ टीम

देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे हे मुख्य तिर्थक्षेत्र पोहरादेवी आहे. संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १०० कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या आराखड्यातील कामे यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावीत. असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.            

दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याचे अधीक्षक दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड यांची उपस्थिती होती.            

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे एका वर्षाच्या आत पुर्ण करावी. ही कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. सुधारित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात यावे. या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता इमारतीच्या अंतर्गत सजावटीची कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावी. मंत्रालयस्तरावरुन पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही. असे त्यांनी सांगितले.            

विकास आराखड्यातील १४ कोटी रुपयांची उर्वरित कामे त्वरीत सुरु करावी. असे सांगून शंभूराज देसाई म्हणाले, संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावी. सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा राहणार नाहीत याबाबतची दक्षता घ्यावी. आराखड्यातील कामे करण्यासाठी मंजूर मर्यादीत रकमेच्या अंतर्गत विविध बाबींसाठी जिल्हास्तरीय समितीने निधी खर्च करण्याचा निर्णय घ्यावा. निधी खर्च होताच उर्वरित निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे ते म्हणाले.            

आमदार श्री. राठोड म्हणाले, तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत कार्य करताना यंत्रणांनी कालमर्यादा निश्चित करुन कामे पूर्ण करावी. या आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या समितीला पूर्ण अधिकार देण्याबाबतचे प्रधान सचिव (वित्त विभाग) यांच्या स्वाक्षरीचे पत्र काढण्यात आल्याचे श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.            

जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीणा, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, सार्वजनिक बांधकाम (विद्युत)विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता बोकडे व मानोरा तहसिलदार श्री. किर्दक यांची उपस्थिती होती.


Tags: MaharashtraPohradevishambhuraj desaiपालकमंत्री शंभूराज देसाईपोहरादेवीसंत सेवालाल महाराज
Previous Post

खेलो इंडिया स्पर्धा: महाराष्ट्राचा हरियाणात विजयी जल्लोष

Next Post

केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना एसआयटीची नोटीस आल्यावर नरेंद्र मोदींनी काय केलं होतं?

Next Post
Narendra Modi SIT notice

केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना एसआयटीची नोटीस आल्यावर नरेंद्र मोदींनी काय केलं होतं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!