मुक्तपीठ टीम
ठाणे जिल्ह्यातील पडघे या ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर आल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या महापुरात पडघे येथील नदी किनारी राहणाऱ्या लोकांचे दररोजचे खाण्यापिण्याचे धान्य, कपडे व इतर वस्तू महापुरात वाहून गेल्याने ही सर्व कुटुंबं मोठ्या संकटात सापडली आहेत. याची माहिती मिळताच शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे आदेश चौधरी यांनी संस्थेकडुन मोठ्या प्रमाणात मदत निधी उभा करून या पूरग्रस्त भागातील ८० ते ९० कुटुंबाना एक महिन्याचे राशन व काही जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवली आहे.
कोकणाबरोबरच ठाणे जिल्ह्यातील काही भागातसुद्धा महापुराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. त्यामुळे जिल्हातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नागरिकांचे खाण्यापिण्याचे वांधेसुध्दा झाल्याचे दिसून येत आहेत. ठाणे जिल्हातील अनेक भागातील नुकसान प्रसिद्धीस न आल्याने अनेक सामाजिक संस्था आपल्या मदस्तीची वाटचाल कोकणाकडे करत आहेत. प्रशासनाचेही या पुरग्रस्तांकडे दुर्लक्ष करत असल्याने या सर्व नागरिकांना आपण उपेक्षित असल्याची जाणीव होत आहे.
तरी या पूरग्रस्त लोकांना शासनाने सुद्धा त्वरित मदत करावी अशी मागणी संस्थेकडुन करण्यात येत आहे. पूरग्रस्त मदत कार्यप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील संस्थेचे भिवंडी कार्याध्यक्ष हरिभाऊ घागस, जिल्हा संघटक अमोल शेलार, हरिश्चंद्र पाटील, महासचिव संजय चौधरी व खजिनदार विलास जाधव उपस्थित होते.