Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोविशिल्ड लसवंतांना कोरोना संसर्गाची शक्यता ९३% कमी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Covishield vaccine

मुक्तपीठ टीम

कोरोना लसींबद्दल उगाचच साशंक असणाऱ्यांच्या मनातील शंका दूर करणारी एक बातमी आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी ही खूपच चांगली बातमी आहे. देशाच्या सशस्त्र दलांमधील १५ लाखांहून अधिक आरोग्य सेवा कामगार आणि फ्रंटलाईन कामगारांवर केलेल्या अभ्यासानुसार, कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्याता ९३ टक्क्यांनी कमी होत आहे.

 

देशात लसींच्या परिणामकतेवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अभ्यास आहे. लस घेऊनही देशात कोरोनाचा संसर्ग दर सुमारे १.६% आहे. म्हणजेच, देशातील १००० लोकांपैकी १६ लोकांना पुन्हा कोरोना होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळाल्यानंतर दोन आठवड्यांनंतरच त्या व्यक्तीचे पूर्णपणे लसीकरण झाले असे मानले जाते.

कोविशिल्ड लसंवतांवरील अभ्यास

  • आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) चा हा अभ्यास लसवंतांवरील जगातील सर्वात मोठा अभ्यास आहे.
  • संशोधकांनी म्हटले आहे की, आतापर्यंत केलेल्या सर्व अभ्यासाचा नमुना आकार हा १० लाखांपेक्षा कमी होता.
  • लसीच्या परिणामकतेवरील जगभरातील सर्वात मोठ्या अभ्यासांपैकी एक आहे.
  • कोविशिल्ड ही ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेकाच्या एझेडडी-१२२२ फॉर्म्युलेशनचा मेड इन इंडिया लस आहे.
  • भारतात सुरू असलेल्या कोरोनाविरोधी लसीकरणातील प्रमुख लसींपैकी ही एक महत्वाची लस आहे.

 

या अभ्यासाच्या निकालांचा संदर्भ देत, नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल म्हणाले की, “हा अभ्यास १५ लाखांहून अधिक डॉक्टर आणि इतर फ्रंटलाइन वर्कर्सवर करण्यात आला आहे. ज्यांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना ९३ टक्के संरक्षण मिळते, असे दिसून आले आहे.”

 

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. ज्यामध्ये सशस्त्र दलातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि इतर फ्रंटलाइन वर्कर्सचे प्रथम लसीकरण करण्यात आले. हा अभ्यास ३० मे पर्यंत लसीकरण झालेल्या या १५ लाख कामगारांवर लसीच्या परिणामावर करण्यात आला.

 

अभ्यासात सहभागी लसवंत!

  • यामध्ये १५,९५,६३० लोकांचे सरासरी वय २७ वर्षांपर्यंत होते. त्यापैकी ९९% पुरुष होते.
  • १३५ दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या अभ्यासात सहभागी स्वयंसेवकांपैकी ३० मे पर्यंत ९५% लोकांना एकच डोस मिळाला होता.
  • ८२% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AFMCcoronacovishield vaccineएएफएमसीऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेकाकोविशिल्ड लसडॉ. व्ही. के. पॉल
Previous Post

गडकिल्लेप्रेमी शंभूदुर्ग प्रतिष्ठानची पूरग्रस्त रयतेला मदत

Next Post

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी केंद्र सरकारची नोंदणी शुल्क माफी

Next Post
e-vehicles

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी केंद्र सरकारची नोंदणी शुल्क माफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!