मुक्तपीठ टीम
“मुंबई बँक असो की इतर सहकारी बँक यांची कोणतीही निवडणूक असो आपल्या पक्षातील लोकांची मदत घेऊन इतरांनी स्वतःची राजकारणात पोळी भाजून घेतली आहे. पण आता राजसाहेबांना अभिप्रेत असलेली सहकार चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. ती पक्षाच्या सहकार सेनेच्या माध्यमातून उभी राहते आहे याचा मला आनंद वाटतो आहे, असे उद्गार मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी मनसे सहकार सेनेच्या सहकार प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी काढले. असं करताना पक्षाच्या जीवावर राजकारणात पोळी भाजून घेणारे असं म्हणताना त्यांचा इशारा सध्या भाजपामध्ये असलेल्या मुंबई बँकेतील सत्ताधारी प्रवीण दरेकरांकडे असल्याचे मानले जाते. त्यांनी पक्षाला मार्गदर्शन करतानाच दरेकरांचे नाव घेतले नसले तरी मुंबई बँकेचा उल्लेख करुन दरेकरांना टोला लगावल्याचे मानले जाते.
शालिनी ठाकरे काय बोलल्या?
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीने सहकार प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
- या शिबिरात सहकार क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
- या मार्गदर्शनाचा लाभ सर्व महिला व पुरुष पदाधिकारी यांना झाला असून सोबत नवीन रोजगाराची संधी सुद्धा निर्माण होऊन अनेक तरुण तरुणी आत्मनिर्भर होऊन चांगले उद्योजक बनतील,यात तिळमात्र शंका नाही.
- आज पर्यंत अनेकांनी स्वतःच्या संस्था उभ्या करून फक्त स्वतःचा फायदा करून घेतला आहे.
- मुंबई बँक असो की इतर सहकारी बँक यांची कोणतीही निवडणूक असो त्यावेळी आपल्या पक्षातील लोकांची मदत घेऊन इतरांनी स्वतःची राजकारणात पोळी भाजून घेतली आहे.
- पण आता राजसाहेब यांना अभिप्रेत असलेली सहकार चळवळ उभी राहणे आवश्यक आहे.
- आणि ती पक्षाच्या सहकार सेनेच्या माध्यमातून उभी राहते आहे याचा मला आनंद वाटतो आहे.
- आज या शिबिराचे उदघाटन करण्याची संधी मला सहकार सेनेचे अध्यक्ष व मनसे नेते श्री.दिलीप(बापू) धोत्रे यांनी दिली.
- त्याबद्दल त्यांचे व सहकार सेनेमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानते.