मुक्तपीठ टीम
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टमने विभागाकडून रोखले. शाहरुख शुक्रवारी रात्री शारजाहून परतत होता. त्याच्याकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. ज्याची किंमत १८ लाख रुपये आहे. या घड्याळांसाठी शाहरुखला आता ६.८३ लाख रुपये कस्टम ड्युटी भरावी लागली आहे.
नेमक प्रकरण काय?
- शाहरुख खान खासगी चार्टर्ड विमानाने दुबईला गेला होता.
- शुक्रवारी दुपारी एक वाजता शाहरुख आणि त्याच्या टीमला T-3 टर्मिनलवर रेड चॅनल ओलांडताना कस्टम विभागाने अडवले.
- त्याची बॅग तपासली असता बॉबन आणि झुर्बक, रोलेक्स घड्याळांचे ६ बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे आणि अॅपलचे घड्याळ सापडले.
- यासोबत घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले आहेत.
शाहरुखनसह बॉडीगार्डला ही भरावी लागली कस्टम ड्युटी…
- शाहरुखला ६.८३ लाख रुपयांचा दंड भरावा लागला.
- विमानतळावर शाहरुखचे बॉडीगार्ड आणि त्याच्या टीममधील इतर सदस्यांना रोखण्यात आले.
- शाहरुखच्या बॉडीगार्डला ६ लाख ६७ हजार रुपये कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे.
- सकाळी ८ च्या नंतर कस्टम अधिकाऱ्यांनी शाहरुखच्या बॉडीगार्डला सोडून दिले.
- दरम्यान शाहरुखने ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरली असून अधिकाऱ्यांना सहकार्यदेखील केले आहे.