मुक्तपीठ टीम
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टीतील सहभागाबद्दल अटक केली. एनसीबीने त्याला ताब्यात घेतल्यापासूनच सोशल मीडियावर आर्यनचे वडिल शाहरुख खानच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ वायरल होऊ लागला आहे. त्या मुलाखतीत शाहरुखने अनेक वर्षांपूर्वी त्याचा मुलगा आर्यनबद्दल जी इच्छा चेष्टेतही व्यक्त केली होती, ती खरी ठरली आहे. सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत शाहरुख आपली पत्नी गौरीसोबत सहभागी झाला होता. त्यात तो म्हणाला होता की मी जे करू शकलो नाही ते सर्व मुलाने करावे. त्याने ड्रग्जही घ्यावे!
शाहरुख खान १९९७ मध्ये सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये सहभागी झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गौरी होती. त्या मुलाखतीत जेव्हा शाहरुखला त्याच्या मुलाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने चेष्टेने का होईना पण असे काही म्हटले जे धक्कादायक होते.
काय म्हणाला होता शाहरुख खान?
- मुलाखतीत जेव्हा सिमी ग्रेवालने शाहरुख खानला विचारले की तो त्याचा मुलगा आर्यनला कसा वाढवणार?
- यावर शाहरुखने म्हटले होते की, त्याचा मुलगा आर्यनने ती सर्व कामे करावीत, जी तो तरुणपणी करू शकत नव्हता.
- शाहरुख म्हणाला की, जे काही तो साधनांच्या अभावामुळे करू शकत नाही, ते सर्व त्याच्या मुलाने करायला हवे.
- शाहरुखने मुलाखतीत म्हटले होते की, आर्यन जेव्हा 3-4 वर्षांचा होईल तेव्हा तो त्याला सांगेल की तो मुलींच्या मागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकतो आणि सेक्स देखील करू शकतो.
- ते म्हणाले की, आर्यनने सर्व काम लवकर सुरू करावे, जे मी करू शकलो नाही ते चांगले आहे.
मुलाला गौरी-शाहरुखने कसे वाढवले?
- आर्यन सध्या २४ वर्षांचा आहे.
- त्यांचा जन्म नोव्हेंबर 1997 रोजी नवी दिल्ली येथे झाला.
- शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
- त्यानंतर आर्यनने लॉस एंजेलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियामधून फिल्म मेकिंग आणि रायटिंगमध्ये पदवी मिळवली.
- आर्यन खान देखील डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिला आहे.
आर्यनेचे करिअर कसे आहे?
- आर्यनने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले आहे.
- आर्यनने ‘कभी खुशी कभी गम’ (2001) चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे.
- या चित्रपटात त्यांनी राहुलचे वडील शाहरुख खानने साकारलेली लहानपणीची भूमिका साकारली होती.
- आर्यनला अभिनयाऐवजी, असेही म्हटले जाते.
- आर्यनला चित्रपट सृष्टीत दिग्दर्शन-निर्मितीत करिअर करायचे आहे, पण अभिनयात नाही, असेही म्हटले जाते.
- करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत अनुभव मिळवत असल्याची चर्चा आहे.
- त्यांनी द लायन किंग या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी सिम्बाच्या पात्रासाठी आवाज दिला होता.