मुक्तपीठ टीम
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सेक्सटॉर्शनचे प्रमाण वाढले आहे. सेक्सटॉर्शनमुळे पुण्यात दोन लोकांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. जानेवारी २०२२ पासून पुण्यात एकूण १ हजार ४४५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये पीडितांनी लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलच्या तक्रारी केल्या आहेत, असे पुणे पोलिस स्टेशनच्या सायबर निरीक्षक मीनल पाटील यांनी सांगितले. काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
पुणे पोलिसांचे जागरुक राहण्याचे आवाहन-
- पाटील यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच प्रकरणांमध्ये पुरुषांचा बळी जातो.
- पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगार एका व्यक्तीला महिलेच्या माध्यमातून चॅटवर अडकवतात.
- महिला संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि मैत्री वाढवण्यासाठी व्हिडिओ कॉल करतात.
- यानंतर ती महिला त्या पुरुषाचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ काढते आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा फेरा सुरू होतो.
- जागरूक राहूनच अशी प्रकरणे टाळता येतील, असे पाटील सांगतात.
- तसेच, आपला मोबाईल नंबर अनावश्यक लोकांसोबत शेअर करणे शक्यतो टाळा.
सेक्स्टॉर्शनला बळी पडण्यापासून कसे वाचावे?
- मोबाईल, लॅपटॉपसह कोणत्याही उपकरणात तुमची वैयक्तिक गोष्टी किंवा नग्न चित्र सेव्ह करू नका, ते कधीही हॅक होऊ शकते.
- सोशल मीडिया आणि कनेक्ट केलेल्या अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका.
- तसेच ओळखीच्या व्यक्तींशीही नको त्या स्वरुपात ऑनलाइन कनेक्ट होऊ नका.
- येथे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
- इंटरनेट किंवा सोशल मीडियावर फक्त तेच शेअर करा जे माहित असणे आवश्यक आहे.
- वैयक्तिक जीवन शेअर करणे टाळा.
- अनोळखी नंबर, लिंक्स आणि ग्रुप्स जॉईन करू नका.
- कोणत्याही अश्लील सामग्रीच्या व्हिडिओवर क्लिक करून तुमचा डेटा हॅक केला जाऊ शकतो.
- तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा.
- अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी तक्रारदाराची प्रतिमा आणि ओळख गोपनीय ठेवावी.