Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केरळमध्ये पत्नी अदलाबदलीचं ‘घटकंचुकी’ सेक्स रॅकेट! सोशल मीडियावरून कारभार! सात पती जेरबंद!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
Karukachal Police station

मुक्तपीठ टीम

केरळमधील कोट्टायम येथे पत्नी स्वॅपिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. रविवारी हे ‘घटकंचुकी’ सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका सदस्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी सांगितले की, ७ जणांना अटक करण्यात आली असून २५ जणांवर नजर ठेवण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत आणखी अटक करण्यात येणार आहे.

 

महिलेने करुकाचल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिच्या पतीने तिला इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवल्याचे महिलेने सांगितले. आरोपी पतीला अटक केल्यानंतर पोलिसांना एका मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागला. जवळपास ५०० जोडपी या रॅकेटशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

करुकाचल पोलिसांनी सांगितले की, हे रॅकेट फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चालवले जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये अनेक उच्चभ्रू लोकांचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेले हे कोट्टायम, पठानमथिट्टा आणि अलापुझा जिल्ह्यातील आहेत. रॅकेटमध्ये सामील असलेले जोडपे जेव्हाही भेटायचे तेव्हा त्यांच्या पत्नींची देवाणघेवाण करायचे. कधीकधी एक स्त्री एकाच वेळी तीन पुरुषांनी सामायिक केली होती. अनेक अविवाहित मुलांनी इतर पुरुषांचे पार्टनर शेअर करण्यासाठी पैसेही दिले.

 

बायकांची अशी व्हायची अदलाबदली

  • एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून समविचारी लोकांची निवड करण्यात आली आणि खासगी ‘कपल स्वॅपिंग’ गटांमध्ये पत्नींची देवाणघेवाण करण्यात आली.
  • या रॅकेटमधून अनेक जण फेसबुकशी जोडले गेले होते.
  • हे रॅकेट बनावट सोशल मीडिया अकाऊंट वापरत होते, त्यामुळे त्याच्याशी संबंधित सर्व लोकांना पकडण्यासाठी वेळ लागेल.
  • या प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • या प्रकरणाशी संबंधित लोकांची सर्व माहिती काढली जात असून या गटातील लोकांचे अन्य कोणत्या गटातील लोकांशी संबंध आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

 

‘घटकंचुकी’ म्हणजे काय?

  • पुण्यात पेशवाईत काहींची घटकंचुकी चालत असे.
  • काही निवडक स्त्री-पुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोळ्या एका घटात घालत.
  • ज्या पुरुषाला ज्या स्त्रीची चोळी सापडे तिच्याशी तो सर्वांदेखत कामक्रीडा करत असे.
  • या पाशवी खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकातही पाचपन्नास वर्षोंपूर्वी प्रघातात होती.

माहिती संदर्भ – इतिहासाचार्य वि. का. राजवाडे समग्र साहित्य


Tags: karukachal police stationkeralSex racketकरुकाचल पोलीस ठाणेकेरळफेसबुकसेक्स रॅकेटसोशल मीडिया
Previous Post

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार!

Next Post

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी मांडलं सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीचं जिल्हा विकासाचं विझन

Next Post
vision of district development to change Comman man standard of living

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी मांडलं सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीचं जिल्हा विकासाचं विझन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!