मुक्तपीठ टीम
कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा २ मेपासून संपूर्ण देशभर सुरू होणार आहे. यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा हा अधिक प्रभावी ठरणार आहे. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या महाराष्ट्राला सीरम इंस्टीट्यूट संपूर्ण सहकार्य करणार आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्याच्या नागरिकांच्या लवकरात लवकर लसीकरणात जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अदार पूनावाला आणि सीरम इन्स्टिटयुट ऑफ इंडियाने महाराष्ट्रात लसीकरणासाठी लवकरात लवकर जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्या राज्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सारख्या जागतिक स्तरीय संस्था असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सामरिक भागीदारीची अपेक्षा करतो.”
CM Uddhav Balasaheb Thackeray has been assured of maximum support by Mr. @adarpoonawalla and the Serum Institute of India to ensure maximum vaccination at the earliest in the State of Maharashtra.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2021
लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड मोठे शस्त्र
• सीरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड ही भारताच्या लसीकरण मोहिमेतील सर्वात मोठे शस्त्र आहे.
• भारत सरकारने कोविशील्डसह भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
• आतापर्यंत, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्यासह भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे.
• पुढील महिन्यापासून स्पुतनिक-व्ही या रशियन लसीचा वापर केला जाण्याचीही शक्यता आहे.