Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार

July 25, 2022
in सरकारी बातम्या
0
नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार 3

मुक्तपीठ टीम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील द्रोणाचार्य, अर्जुन, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा भावपूर्ण सोहळा शनिवारी सायंकाळी मानकापूर क्रीडा स्टेडियममध्ये रंगला. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरला विविध क्रीडा प्रकारात वैभव प्राप्त करुन देणारे खेळाडू, प्रशिक्षक, वृत्त संकलन करणारे क्रीडा पत्रकार या सोहळ्याला उपस्थित होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी प्रत्येक खेळाडूंचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

व्यासपीठावर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मुनीश्वर, उपसंचालक क्रीडा शेखर पाटील, विम्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष बदखल, डॉ. नेहा बदखल, डॉ. ईशा कुमारी, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक उपस्थित होत्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी नागपूर मधील इतक्या मोठ्या संख्येने शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंशी संवाद साधताना आनंद होत आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण होण्याची जिद्द आहे. पायाभूत सुविधा व त्यासाठी कार्य करणाऱ्या संघटना आहेत. क्रीडा क्षेत्रातही उत्तम करिअर घडू शकते. हे नव्या पिढी बिंबविण्याचे काम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या जाणत्या क्रीडापटूंना बघून, भेटून व संवाद साधून त्यांच्या दायित्वाची कल्पना येते. या एका पिढीने प्रचंड कष्ट घेतल्यामुळे सुविधा नसणाऱ्या काळात नागपूरच्या नावलौकिकाला ते वाढवू शकले. त्यामुळे नव्या पिढीने जोमाने या क्षेत्रात पदार्पण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिव छत्रपती पुरस्कार, राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त तीस खेळाडूंचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

शिव छत्रपती पुरस्कार विजेते विजय कविश्वर, अँथलेटीक्समध्ये दादोजी कोंडदेव पुरस्कार संजय काणे,  सिताराम भोतमांगे दादोजी कोंडदेव (हँडबॉल), डॉ. सुनील भोतमांगे दादोजी कोंडदेव, शिवछत्रपती पुरस्कार (हँडबॉल), संदीप गवई एकलव्य पुरस्कार (दिव्यांग धनुर्विद्या), संजय लोखंडे शिवछत्रपती पुरस्कार (संघटक), यापुढील सर्व मान्यवर हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते होत. त्यात अतुल दुरुगकर (हँडबॉल) पियुष आंबुलकर (सॉफ्ट बॉल,) निखिलेश तभाणे व पियुष आकरे (स्केटिंग), मोहम्मद कुरेशी, श्रीमती लक्ष्मी चौरे, वैशाली नागुलवार, नंदकुणाल धनविजय आणि दामिनी रंभाड (तलवारबाजी), शत्रुघ्न गोखले व सतिश वरिअर (बास्केटबॉल), राजकुमार नायडू, मिलींद माकडे, रुपकुमार नायडू, मृदुला केदार, आत्माराम पांडे, आशिष बँनर्जी, अनिता हलमारे-भोतमांगे, इंद्रजितसिंग रंधवा, भावना किंमतकर, प्रिती सुपारे, समिक्षा ईटनकर, अश्लेशा इंगोले (हँडबॉल) दिपक कविश्वर, प्रवीण वहाले, भूषण गोमासे, सौरभ मोहोड आणि डॉ. अशोक पाटील (आट्यापाट्या), शारदा नायडू, नितू नेवारे, नसीम शेख, भूषण बांते, कल्पना मिश्रा, आशा मेश्राम आणि लता यादव (फुटबॉल) अंजली देशपांडे, अरुणा आरवे आणि सुनील भडांगे (व्हॉलीबॉल), अपर्णा भोयर, माधुरी गुरनुले, स्वाती गुरनुले आणि वैशाली चतारे (अँथलेटीक्स), गजानन बुरडे, प्रदीप देशपांडे, सुशील झाम आणि दिनेश सार्वे (सायकलपोलो) असून, खालील पुरस्कारार्थी दिव्यांग उत्तम मिश्रा, प्रवीण उघडे, गिरीश नागभिडकर, संजय भोसकर आणि वैशाली थुल (अँथलेटीक्स) भारत्तोलनमध्ये प्रवीण सोरते, लतिका माने -लेकुरवाळे, रोशनी रिंके आणि प्रतिमा बोंडे या पुरस्कारार्थींचा समावेश आहे.


Tags: Amrut Mahotsav of IndependencenagpurSportspersonखेळाडूनागपूरस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
Previous Post

उद्धव ठाकरेंचा बुधवारी वाढदिवस, संकट काळात शिवसैनिकांकडे मागितली खास भेट

Next Post

आमदार फुटले, खासदार गेले…संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार?

Next Post
uddhav Thackeray interview teaser

आमदार फुटले, खासदार गेले...संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!