Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता आर वेंकटरमनी देशाचे नवे अॅटर्नी जनरल, केके वेणुगोपाल यांच्या जागी नियुक्ती

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
R ventakmani

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ वकील आर वेंकटरमनी यांची भारताचे नवे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ वकील वेंकटरमनी यांची राष्ट्रपतींनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी के. के वेणुगोपाल यांची जागा घेतली आहे ज्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. ९१ वर्षीय वेणुगोपाल यांची जुलै २०१७ मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

वेंकटरमनी यांच्याआधी केंद्र सरकारने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना ही ऑफर दिली होती. मात्र केंद्र सरकारची ही ऑफर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी नाकारली. आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचेही रोहतगी यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत वेंकटरमनी?

  • १९ एप्रिल १९५० रोजी पूद्दूचेरी येथे जन्मलेले वेंकटरमनी जुलै १९७७ मध्ये तामिळनाडूच्या बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून रुजू झाले.
  • १९७९ पासून सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.
  • १९९७मध्ये त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील म्हणून नामांकित केले होते.
  • वेंकटरमनी यांची २०१० मध्ये कायदा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि पुन्हा २०१३ मध्ये दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो…

  • भारत सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
  • सामान्यत: अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.
  • अ‍ॅटर्नी जनरलची नियुक्ती भारत सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात.
  • भारत सरकारच्या मुख्य कायदेशीर सल्लागाराची भूमिका अ‍ॅटर्नी जनरल बजावतात.

Tags: central govtR Venkataramaniअ‍ॅटर्नी जनरलआर वेंकटरमनीकायदा मंत्रालयभारत सरकार
Previous Post

आज सरकारकडे सॅनिटरी पॅड मागता, उद्या कंडोमही मागाल! पाकिस्तानात जा” मुलींसमोर बरळणारी महिला ही IAS अधिकारी आहे, बरं!

Next Post

World Heart Day 2022: काही चांगलं खा…घरगुती उपायांनी घ्या हृदयाची काळजी…

Next Post
World Heart Day

World Heart Day 2022: काही चांगलं खा...घरगुती उपायांनी घ्या हृदयाची काळजी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!