Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज सरकारकडे सॅनिटरी पॅड मागता, उद्या कंडोमही मागाल! पाकिस्तानात जा” मुलींसमोर बरळणारी महिला ही IAS अधिकारी आहे, बरं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
आज सरकारकडे सॅनिटरी पॅड मागता, उद्या कंडोमही मागाल! पाकिस्तानात जा” मुलींसमोर बरळणारी महिला ही IAS अधिकारी आहे, बरं!

मुक्तपीठ टीम

बिहारमधील एका विद्यार्थिनीने सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देण्याच्या मागणीवर बिहारच्या एका वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने किळसवाणं उत्तर दिले आहे. ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम मागाल’! एवढंच नाही तर मत देत असल्यानं मागत असाल तर पाकिस्तानात जा, असंही त्या बोलल्याने सर्वांनाच धक्का बसला.

सरकार मोफत सॅनिटरी पॅड देऊ शकत नाहीत का?

  • राजधानी पाटणामध्ये महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लान इंटरनॅशनल यांनी ‘सशक्त बेटी, समृद्धी बिहार: टुवर्ड्स एन्हान्सिंग द वैल्यू ऑफ गर्ल चाइल्ड’ या थीमवर एक कार्यक्रम आयोजित केला होता.
  • बिहारमधील मुली आणि महिलांशी संबंधित समस्या आणि त्यांच्यासाठी सुरू असलेल्या कामांबद्दल मुलींना माहिती देणे आणि जागरुक करणे हा त्याचा उद्देश होता.
  • कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने,सरकार अनेक गोष्टी मोफत देत आहे. मग ते आम्हाला २० ते ३० रुपयांत मिळणारं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाहीत का? अशी विचारणा केली.

आयएएस अधिकारी महिलेचे अजब वक्तव्य!

  • यावर वरिष्ठ आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी उत्तर दिले की, ‘अशा मागण्या काही संपणार नाही. सरकारकडे आज २०-३० रुपयांचं सॅनिटरी पॅड देऊ मागाल. उद्या जीन्स पँट, परवा चपला. शेवटी जेव्हा कुटुंब नियोजनाची वेळ येईल तेव्हा कंडोमही मोफत मागाल.
  • सरकारकडून काहीही घेण्याची गरजच काय? हा विचारच चुकीचा आहे.
  • त्यावर विद्यार्थिनीने उत्तर दिले की, जनतेच्या मतांनीच सरकार बनते.
  • यावर महिला अधिकारी म्हणाल्या, ‘हा मूर्खपणाचा कळस आहे. मतदान करू नका, पाकिस्तानात जा.
  • विद्यार्थिनी पुढे यावर म्हणाली की, मी भारतीय आहे. मी पाकिस्तानात का जाऊ? तर महिला अधिकारी म्हणाल्या, ‘तुम्ही पैसे आणि सेवांसाठी मत देता का?’

वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या अबज उत्तरांचा फेरा सुरूच राहिला…

  • जेव्हा दुसऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की, तिच्या शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.
  • अनेकदा मुलंही त्यात प्रवेश करतात.
  • यावर अधिकारी हरजोत कौर बमरा यांनी विद्यार्थ्यालाच एक बेतुका प्रश्न विचारला.
  • त्यांनी विचारले की तुमच्या घरात वेगळे शौचालय आहे का?
  • तुम्ही लोक अशाच वेगवेगळ्या गोष्टी मागत राहिल्या तर कसे चालेल, असे त्यांनी विद्यार्थिंनीना सांगितले.
  • ते पुढे म्हणाले की, विचार बदलण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला भविष्यात कुठे पाहता हे तुम्ही ठरवायचं असतं.
  • तुम्ही आता जिथं बसला आहात तिथं बसायचं की जिथं मी बसेल आहे तिथं? सरकार यासाठी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही.

Tags: biharCondomIAS OfficerSanitary padsकॉन्डमबिहारसॅनिटरी पॅडहरजोत कौर
Previous Post

 शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषीपंप ! कृषीफिडर सौर उर्जेवर आणणार – देवेंद्र फडणवीस

Next Post

आता आर वेंकटरमनी देशाचे नवे अॅटर्नी जनरल, केके वेणुगोपाल यांच्या जागी नियुक्ती

Next Post
R ventakmani

आता आर वेंकटरमनी देशाचे नवे अॅटर्नी जनरल, केके वेणुगोपाल यांच्या जागी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!