मुक्तपीठ टीम
व्हाट्सअॅप वापरत असताना युजर्सना जर तातडीने कुणाला पैसे पाठवायचे असतील तर पैसे पाठवण्यासाठी पेमेंट अॅप वर जाण्याची सध्या गरज नसते. व्हाट्सअॅपने UPI आधारित डिजिटल पेमेंट सेवा २०२१मध्ये सुरू केल्यापासून थेट तेथूनच पैसे पाठवता येतात. लाँचिंगच्या वेळी देण्यात आलेली कॅशबॅक ऑफर आता पुन्हा देण्यात आली आहे. व्हाट्सअॅपच्या UPI द्वारे तीन वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्सना पैसे पाठवल्यास ३३ रुपयांचा कॅशबॅक मिळेल, म्हणजेच प्रत्येक ट्रांझेक्शनवर ११ रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.
व्हॉट्सअॅपची एका पेमेंटवर ११ रुपयांची कॅशबॅक ऑफर!
- ही कॅशबॅक फक्त त्या युजर्ससाठी उपलब्ध असेल ज्यांचे अॅपवर गिफ्ट आयकॉन दाखवत आहे.
- जर तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये गिफ्ट आयकॉन असेल तर, कोणत्याही तीन व्हाट्सअॅप UPI पेमेंट युजर्सला पैसे पाठवून ३३ रुपयांचा कॅशबॅक मिळवा.
- जर PhonePe, Google Pay किंवा Paytm इत्यादी वर पैसे दिले तर कॅशबॅक मिळणार नाही.
- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने व्हाट्सअॅप UPIसाठी अतिरिक्त ६ कोटी युजर्सना मंजुरी दिली आहे.
- सर्वप्रथम NPCI ने २ कोटी आणि नंतर ४ कोटी युजर्स मंजूरी दिली होती.
ऑक्टोबर २०२१ मध्ये, व्हाट्सअॅपने अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी UPI पेमेंटवर ५१ रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला होता. तेव्हा युजर्सच्या अॅपमध्ये गिव्ह कॅश, गेट ₹५१ बॅक असे दिसत होते. त्यावर असेही लिहिले होते की, प्रत्येक वेळी व्हाट्सअॅप पे द्वारे पाच वेळा पैसे पाठवल्यास ५१ रुपयांचा कॅशबॅक म्हणजेच एकूण २५५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल.