Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंचं छायाचित्र शाखेत लावण्याला विरोध! शिवसैनिक महिलेवर राजद्रोहाचा गुन्हा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kavita gavand

मुक्तपीठ टीम

डोंबिवलीतील शिवसेना शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो पुन्हा लावण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात प्रचंड राडा झाला होता. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली होती. शिवसेनेच्या महिला विधानसभा संघटक कविता गावंड यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले. याप्रकरणी शिंदे गटातील योगेश जुईकर यांनी डोंबिवलीतील राम नगर पोलीस ठाण्यात कविता गावंड यांच्या विरोधात तक्रार दिली. यावरून गावंड यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

  • डोंबिवली मध्यवर्ती शाखेतच खासदार डॉ शिंदे यांचे देखील कार्यालय आहे.
  • मात्र शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी खासदार कार्यालयातील शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवून शिंदे समर्थकांना शाखेत येण्यास प्रतिबंध केला होता.
  • मात्र मंगळवारी शिंदे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाखेत शिरले.
  • त्यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शिंदे यांचे हटवलेले फोटो पुन्हा भिंतीवर लावले.
  • यावेळी शाखेत उपस्थित असलेल्या ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकामध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली होती.
  • यावेळी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली होती.
  • पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
  • यामुळे शाखेला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं.

मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्याने महिला पदाधिकाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल !!

  • पुरुष कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या ठाकरे समर्थक महिला कार्यकर्त्यांची पोलिसांनी दखल घेतली नव्हती.
  • यानंतर काही वेळातच पोलिसांनी गावंड यांच्यावर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.
  • शिंदे गटातील योगेश जुईकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात भादवी १५३ अ आणि ५०५ कलमाअंतर्गत तक्रार दिली होती.
  • त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.
  • ही शाखा कविता गावंड यांच्या वडिलांच्या काळातच बांधण्यात आली होती. तरीही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं संतापाचं वातावरण आहे.

Tags: CM EknathCm Eknath ShindedombivaliShivsenaकविता गावंडडोंबिवली शिवसेना शाखामुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेनाश्रीकांत शिंदे
Previous Post

वर्धा जिल्हा परिषदेत तांत्रिक तज्ज्ञ, तांत्रिक समन्वयक पदांवर ३ जागांसाठी संधी

Next Post

योगी आदित्यनाथांनी त्यांच्या संघटनेच्या सर्व शाखा बरखास्त का केल्या?

Next Post
hindu yuva vahini

योगी आदित्यनाथांनी त्यांच्या संघटनेच्या सर्व शाखा बरखास्त का केल्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!