Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था- आयआयआयटी नागपूरचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Second convocation of IIIT Nagpur concluded

मुक्तपीठ टीम

आयआयआयटी-नागपूर -म्हणजेच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूरचा दूसरा दीक्षांत समारंभ संस्थेच्या परिसरात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांसह, त्यांचे पालक, आणि देशभरातील या क्षेत्राशी संबंधित लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी, ट्रिपल आयटीएन मधून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना १४६ पदवी प्रदान करण्यात आल्या. यात, चार पीएचडी पदव्या, १४२ स्नातकपूर्व पदव्या देण्यात आल्या. त्याशिवाय, आयूषी टंडन  या ईसीई शाखेच्या विद्यार्थिनीला (सीजीपीए ९.३७) तसेच, अरुण दास या सीएसई (सीजीपीए : ९.३६) शाखेच्या विद्यार्थ्याला विशेष प्रावीण्य पुरस्कार देण्यात आला. त्याशिवाय, ७० पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्रेही  प्रदान करण्यात आली.

दीक्षांत समारंभाची सुरुवात एका भव्य शैक्षणिक मिरवणुकीने झाली, त्यानंतर प्रास्ताविक आणि त्यानंतर संस्थेचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांनी संस्थेच्या अहवालाचे सादरीकरण केले.  यावेळी संचालकांनी २०१६ मध्ये संस्थेच्या स्थापनेपासून सहा वर्षात साध्य केलेल्या उपलब्धी आणि विकासाची माहिती दिली.

पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. होते. कुलसचिव कैलास दाखले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIITN) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या २० भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांपैकी एक आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) कायदा, २०१७ च्या तरतुदींनुसार IIITN ला “राष्ट्रीय स्तरावरील  महत्त्वाची संस्था” म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या संस्थेच्या कार्यान्वयनाची सुरुवात २०१६-१७ या वर्षापासून झाली.  शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत बुटीबोरी नागपुरातील तिच्या कायमस्वरूपी संकुलात  स्थलांतरित झाली. या संस्थेला, महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण  विभागाचे पाठबळ आहे, तसेच, उद्योग भागीदार म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचेही पाठबळ आहे.

 

पाहा:


Tags: good newsGood news MorningIIIT NagpurIndian Institute of Information Technology NagpurTripel ITAट्रिपल आयटीएनभारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था-नागपूर
Previous Post

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड: जाणून घ्या प्रत्येक सदस्याला मिळणाऱ्या ७ लाखांच्या विम्याविषयी…

Next Post

Samsung Galaxy A14 5G: सर्वात स्वस्त 5G फोन होणार लाँच!!

Next Post
Samsung Galaxy A14 5G

Samsung Galaxy A14 5G: सर्वात स्वस्त 5G फोन होणार लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!