Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी आरक्षण : सरकारच्या अधिकार काढण्याच्या हालचाली, तर आयोगाची निवडणुकांची जय्यत तयारी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra state election commission

मुक्तपीठ टीम

ओबीसी आरक्षणासंबंधित मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर ओबीसींचे राजकिय आरक्षण लागू होईपर्यंत मनपा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेचे अधिकार राज्य सरकार स्वत:कडे घेण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही मनपा निवडणुका घेण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

 

मुंबई, ठाण्यासह सर्व मनपाच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली.

  • प्रभाग रचनेचा मसुदा प्रसिद्ध झाला आहे.
  • त्यावरील हरकती व सूचनांची सुनावणी झाली.
  • या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने नेमलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून आठ मनपाचे अभिप्राय निवडणूक आयोगाकडे आले.
  • आता प्रभार रचनेचा आढावा, प्रभागांचे आरक्षण, मतदारयाद्यांची प्रसिद्धी आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे ही प्रक्रिया शिल्लक असल्याचे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थांनी सांगितले.

 

राज्य सरकारसाठी कसोटी

  • निवडणूक प्रक्रियेचे अधिकार शासनाने स्वत:कडे घेण्यासाठी सोमवारी नगरविकास आणि ग्रामविकास कायद्यात बदल करणारी विधेयके मांडली जातील, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते.
  • विधेयके एकमताने मंजूर झाली तरी त्याला राज्यपालांची संमती मिळेल का, असा प्रश्न आहे.
  • कारण विधेयकाला संमती कधी आणि किती वेळेत द्यायची, याचे राज्यपालांवर बंधन नसते.
  • तसेच हे अधिकार राज्य शासनाकडे स्वत:कडे घेण्याची कृती सर्वोच्च न्यायालयाच्या २००६मधील निकालाच्या विसंगत आहे.
  • परिणामी, कायदेशीर लढाई अटळ आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेशात काय म्हटलं?

  • सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालपत्रात मुदत संपलेल्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच महानगरपालिका, २०० नगरपालिका आणि ८०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घ्याव्यात, असा आदेश दिला आहे.

 

मध्यप्रदेशातील तरतूद कोणती?

  • मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सांगितले.
  • ७३व्या आणि ७४व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
  • तत्पूर्वी महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये या निवडणुका राज्य सरकारमार्फत घेतल्या जात
    होत्या. १९९४ मध्ये राज्य निवडणूक आयोग स्थापन झाला.
  • त्यावेळी निवडणुकांचे सारे अधिकार आयोगाकडे देण्यात आले.
  • मध्यप्रदेश सरकारने मात्र प्रभाग रचना, प्रभागांमधील मतदारसंख्या, त्यांचे आरक्षण हे सारे अधिकार निवडणूक आयोगाकडे न देता स्वत:कडेच ठेवले होते.
  • मध्यप्रदेश पंचायती कायद्यातील १०६ कलमानुसार हे सर्व अधिकार मध्यप्रदेश सरकारकडे आहेत.
  • हेच अधिकार महाराष्ट्र सरकार १९९४ नंतर तीन दशकाने पुन्हा स्वत:कडे घेणार आहे.

Tags: state election commissionओबीसी आरक्षणनिवडणूक आयोगराज्य निवडणूक आयोग
Previous Post

डिझेल, पेट्रोल, गॅसच नाही आता तयारी ठेवा वाहन विमाही जास्त भरण्याची!

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी

Next Post
Dr vijay Maheshwari

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!