मुक्तपीठ टीम
आज देशात दिपोत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. भारतातील या सणाबद्दल लोकांचे प्रेम आणि आपुलकी पाहून गुगलने यावर्षी युजर्सना जबरदस्त सरप्राईज दिले आहे. यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये जावे लागेल, एक कोणताही शब्द टाइप करा आणि एंटर बटण दाबा. असे केल्याने, फोन स्क्रीन किंवा डेस्कटॉप/ कॉम्प्युटर स्क्रीनही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघेल.
‘या’ दिवाळी सरप्राईजला पाहाण्यासाठी काय करावे?
- गुगलने दिलेल्या सरप्राईजचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम ब्राउझरवर ‘दिवाळी’ हे टाइप करून सर्च करा.
- यानंतर तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक पेज उघडेल. या पेजवर अॅनिमेटेड दिवा लावला जाईल.
- तुम्हाला फक्त त्या दिव्यावर क्लिक करावे लागेल. तुम्ही त्या पेटलेल्या दिव्यावर क्लिक करताच, स्क्रीनवर अनेक दिवे दिसतील.
- यापैकी एक दिवा जळत असेल आणि बाकीचे सर्व दिवे विझलेले असतील.
- जर तुम्हाला हे विझलेले दिवे लावायचे असतील तर त्यासाठी या दिव्यांवर माउसने कर्सर फिरवावा लागेल.
- असे केल्याने सर्व विझलेले दिवे जळू लागतील.
- सर्व दिवे प्रज्वलित झाल्यानंतर, तुमच्या डेस्कटॉपची स्क्रीन चमकेल आणि ते पाहण्यास अतिशय सुंदर दिसेल.
स्मार्टफोनवर या सरप्राईझचा आनंद कसा घ्यावा?
- डेस्कटॉप/ लॅपटॉप नसला तरी काळजी करण्याची गरज नाही.
- स्मार्टफोनच्या माध्यमातूनही तुम्ही या सरप्राईजचा आनंद घेऊ शकाल.
- स्मार्टफोनवर याचा फायदा घेण्यासाठी तुमच्या सर्च बारवर जा आणि दिवाळी २०२२ लिहून सर्च करा.
- डेस्कटॉपप्रमाणेच तुमच्या स्मार्टफोनवर एक पेज उघडेल ज्यावर अॅनिमेटेड दिवा पेटवला जाईल.
- फक्त त्या दिव्यावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यावर तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर अनेक दिवे एकत्र येतील.
- त्यांच्यावर बोट फिरवून त्यांना उजळंवावे लागेल.