मुक्तपीठ टीम
सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु होत आहेत. परंतु, शाळा सुरु होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही, असे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी सांगितले. ते म्हणाले की, सोमवारपासून आम्ही शाळा पुन्हा सुरू करत असलो तरी विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक नाही. याबाबत पालक स्वतः निर्णय घेण्यास मोकळे आहेत आणि जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हाच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे.
कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी सांगितले की महाराष्ट्रातील इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या शाळा २४ जानेवारी रोजी कोरोना प्रोटोकॉलसह पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.
६२% पालक सरकारच्या निर्णयावर सहमत नाहीत
- त्याचवेळी लोकस सर्व्हिस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ६२ टक्के पालक ठाकरे सरकारच्या शाळा उघडण्याच्या निर्णयावर नाराज असल्याचे समोर आले आहे.
- त्याच वेळी, ११ टक्के पालकांनी काहीही सांगितले नाही.
- या सर्वेक्षणात एकूण ४९७६ लोकांचा समावेश करण्यात आला होता.
- तिसरी लाट संपेपर्यंत ते मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, असा बहुतेक पालकांचे म्हणणे आहेत.
महाराष्ट्रातील पुन्हा उघडलेल्या शाळांची यादी
- मुंबई : २४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत
- पुणे : निर्णय घेतला नाही
- नाशिक : २४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत
- ठाणे : २४ जानेवारीपाशाळा सून सुरू होणार आहेत
- अहमदनगर : निर्णय झालेला नाही
गेल्या २४ तासात राज्यात ४०,८०५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर २७,३७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात ४४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१५% एवढे झाले आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २५५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.