Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील शाळा विद्यार्थ्यांनी फुलल्या…पूर्ण क्षमतेनं सुरु!

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Hansaraj School Andheri Mumbai

मुक्तपीठ टीम

राज्यातील कोरोनाचा कमी झालेला प्रभाव व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मान. मनपा आयुक्त यांची संदर्भ क्र. १४ अन्वये मंजुरी प्राप्त झाली. व आज मुंबई शहरातील सर्व शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. मुलाचा उत्साह व मित्रांना बर्‍याच दिवसांनी भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसडंत होता.

Hansaraj School Andheri Mumbai -2

शाळा सुरू करताना विशेष सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

१. कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊन मान. मनपा आयुक्त यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या शाळा बंद अथवा सुरु करण्याबाबत यापूर्वी निर्गमीत करण्यात आलेली सर्व कोरोना आरोग्य विषयक सुचनांचे पालन करावे.

२. दि. २ मार्च २०२२ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु कराव्यात.

३. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळासुद्धा ऑफलाईन पद्धतीने पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यात याव्यात.

४. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी.

 

५. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती १००% असणे आवश्यक आहे

६. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांचे 100% लसीकरण करावे.

७. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या तासामध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत व या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.

८. वर्गाध्यापन, स्कूलबस / स्कूलव्हॅन मध्ये व शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल परंतु मैदानी खेळ, शारिरीक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल.

९. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल.

१०. विद्यार्थ्यांसाठी लसीकरण अत्यंत सुरक्षित असून तज्ञांच्या सल्ल्याने त्याची निश्चिती करण्यात त्याअनुषंगाने पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांचे १००% लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रशासकीयलसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी (शाळा), आरोग्य अधिकारी व विभागीय सहा. आयुक्त यांनी समन्वय साधून विशेष शिबिरांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात यावे.

११. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले कोमॉर्बिडिटीज व क्रॉनिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्र आवश्यक असेल.

१२. कोरोना सदृश्य लक्षणे (उदा. सर्दी, खोकला, घसादुखणे व ताप इ.) आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नये. .

१३. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यस्थापनांच्या पूर्णक्षमतेने शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याकरीता खाजगी बससेवा व बेस्ट बसमधून पूर्णक्षमतेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी.

सर्व शाळांनी उपरोक्त मुद्दा क्र.१ ते १३ येथील सुचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AndheriHanshraj Morarji public Schoolmumbaischoolsअंधेरीबृहन्मुंबई महानगरपालिकाशाळाहंसराज मोरारजी पब्लिक स्कूल
Previous Post

आर्यन शाहरुख खानला एनसीबी विशेष पथकाची क्लीन चिट, तर वानखेडेंच्या कारवाईबद्दल संशय!

Next Post

जयंत पाटील यांनी शब्द पाळला, वडा चाखला!

Next Post
जयंत पाटील यांनी शब्द पाळला, वडा चाखला!

जयंत पाटील यांनी शब्द पाळला, वडा चाखला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!