Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्यन शाहरुख खानला एनसीबी विशेष पथकाची क्लीन चिट, तर वानखेडेंच्या कारवाईबद्दल संशय!

आर्यनकडे ड्र्ग्स नव्हते, तो कटातही नव्हता! वानखेडेंनी मात्र एनसीबी मॅन्युअलचे पालन केले नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aryan khan nd Wankhede

मुक्तपीठ टीम

कॉर्डेलिया क्रूझप्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या विशेष तपास पथकाच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते, हे तपासाअंती उघड झाले आहे. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असं या समितीनं म्हटलं आहे.

 

एनसीबीच्या एसआयटीचे निष्कर्ष

  • आर्यनने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितलं नव्हतं.
  • आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती.
  • चॅट्स असे सुचवत नाहीत की आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता.
  • एनसीबी मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नव्हता.
  • गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत.

 

एनसीबीच्या माजी विभागीय अधिकारी वानखेडेंच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

  • एसआयटीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात.
  • हा अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी कायदेशीर मतं घेतली जातील.
  • विशेषत: आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळले नसतानाही ड्रग्ज सेवनासाठी शिक्षा होऊ शकते का, या पैलूवर कायदेशीर मतं घेतली जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
  • मात्र एसआयटीच्या तपासाने छापेमारी आणि एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • एसआयटीने अनेकदा वानखेडे यांचीसुद्धा चौकशी केली आहे.

 

कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरण नेमकं काय?

  • २ ऑक्टोबर २०२१ रोजी वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता.
  • या छाप्यात एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती.
  • त्यानंतर याप्रकरणात एनसीबीने आणखी १७ जणांना अटक केली.
  • व्हॉट्सअॅप चॅट्सचा आधार घेत वानखेडे यांच्या टीमने दावा केला की हे आरोपी ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा भाग आहेत.
  • आर्यन खान काही परदेशी ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
  • जवळपास महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली होती.

Tags: Aryan KhanAryan khan drugs caseNCBSameer Wankhedeआर्यन खानएनसीबीकॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणसमीर वानखेडे
Previous Post

जयंतरावांनी दिलेला शब्दही पाळला अन् साबुदाणा वडाही चाखला

Next Post

मुंबईतील शाळा विद्यार्थ्यांनी फुलल्या…पूर्ण क्षमतेनं सुरु!

Next Post
Hansaraj School Andheri Mumbai

मुंबईतील शाळा विद्यार्थ्यांनी फुलल्या...पूर्ण क्षमतेनं सुरु!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!