Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१९९२-९३च्या मुंबई दंगलग्रस्तांना शोधा, नुकसानभरपाई द्या : सर्वोच्च न्यायालय

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court 2

मुक्तपीठ टीम

१९९२-९३ च्या काळात बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईची दंगल सर्वांना ठाऊक आहे. मुंबईकरांसाठी हा काळ अत्यंत दहशतीचा आणि भीतीदायक होता. यामध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागलेत. यावर तब्बल तीस वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश देत, या दंगलीतील पीडितांचा शोध घेत नुकसान भरपाई देण्याचे सांगितले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत हमी दिलेल्या लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात तत्कालीन राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

या दंगलीत ९०० जणांचा जीव गेला तर २ हजाराहून अधिक जखमी झाले!!

  • सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर नागरिकांना जातीय तणावाच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात असेल तर त्याचा अनुच्छेद २१ द्वारे हमी दिलेल्या जगण्याच्या अधिकारावर परिणाम होतो.
  • डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या हिंसाचारामुळे प्रभावित भागातील रहिवाशांच्या सन्माननीय आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या अधिकारावर विपरित परिणाम झाला.
  • या दंगलीत ९०० लोक मारले गेले आणि २ हजाराहून अधिक जखमी झाले.
  • नागरिकांची घरे, व्यवसायाची ठिकाणे आणि मालमत्ता यांचे नुकसान झाले.
  • हे सर्व भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत अधिकारांचे उल्लंघन आहेत.
  • न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती अभय एस ओका आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने सांगितले की, दंगलीतील पीडितांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार आहे, कारण त्यांच्या त्रासाचे मूळ कारण म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले?

  • सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला १०८ बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारसांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आणि त्यांना जानेवारी १९९९ पासून वार्षिक ९ टक्के दराने व्याजासह २ लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले.
  • दंगलीतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रलंबीत प्रकरणे पुन्हा सुरू करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
  • न्यायालयाने राज्य सरकारला एका महिन्याच्या आत मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला ९७ निकामी प्रकरणांचा तपशील देण्यास सांगितले.
  • ज्या न्यायालयांमध्ये खटले प्रलंबित आहेत त्यांना उच्च न्यायालयाने आवश्यक माहिती द्यावी जेणेकरून आरोपींचा शोध घेण्यासाठी आवश्यक पावले उचलता येतील.

सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली-

  • सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्देशांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील स्थापन केली आहे.
  • ही समिती न्यायालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे.
  • दंगलीच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती श्रीकृष्ण समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणाऱ्या शकील अहमद यांनी २००१ मध्ये दाखल केलेल्या रिट याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.

Tags: LawmumbaiMumbai Riotsstate govtSupreme Courtकायदामुंबईमुंबई दंगलराज्य सरकारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

CNG – PNG दरांचा भडका! गाडी चालवणं अधिकच महागलं…

Next Post

हिवाळा आला तब्येत बनवा! अक्रोड खा भिजवून, जास्तच लाभ!

Next Post
Walnuts

हिवाळा आला तब्येत बनवा! अक्रोड खा भिजवून, जास्तच लाभ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!