Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेगासस हेरगिरीचा निकाल लागला: २९ पैकी ५ मोबाइलमध्ये मालवेअर, मात्र हेरगिरीचे ठोस पुरावे नाहीत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SC on Pegasus Spyware

मुक्तपीठ टीम

आज सर्वोच्च न्यायालयात पेगासस हेरगिरी प्रकरणाची महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. पेगासस हेरगिरी चौकशीसाठी नेमलेल्या न्यायमूर्ती आरव्ही रवींद्रन समितीच्यावतीने एक अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. या अहवालानुसार २९ पैकी फक्त ५ मोबाइलमध्ये मालवेअर आढळले आहेत. त्यामुळे पेगासस हेरगिरीचे ठोस पुरावे आढळले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. चार आठवड्यांनंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, सरकारकडून पुरेसे सहकार्यही मिळालं नसल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

स्पायवेअरच्या मदतीनं राजकारणी, पत्रकारांवर पाळतीचा आरोप

  • इस्रायली कंपनीने विकसित केलेल्या पेगासस या स्पायवेअरने राजकीय नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
  • सर्वोच्च न्यायालयाने पेगासस हेरगिरी प्रकरणी तांत्रिक समिती स्थापन केली होती.
  • सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली.
  • खंडपीठासमोर तीन भागातील अहवाल आले आहेत.
  • त्यातील दोन अहवाल हे तांत्रिक समितीचा असून एक भाग हा सर्वोच्च न्यायालयाल निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या समितीचा आहे.
  • या अहवालातील एक भाग सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे खंडपीठाने म्हटले.
  • न्या. रविंद्रन यांच्या समितीने केलेल्या शिफारसी या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होणार असल्याचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी सांगितले.

राजकारणी, पत्रकार आणि कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी सरकारी संस्थांकडून इस्रायली स्पायवेअरचा वापर केल्याच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी दिले होते.


Tags: pegasus spywareSupreme Courtपेगासस हेरगिरीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

पीटर जॅटकोचा ट्विटरवर सायबरसुरक्षा धोरणांचा आरोप, प्रकरणाला वेगळे वळण

Next Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास सलग चार आठवडे नंबर १! तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझाची घसरण सुरुच!!

Next Post
Tv Rating Week 33

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास सलग चार आठवडे नंबर १! तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझाची घसरण सुरुच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!