Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास सलग चार आठवडे नंबर १! तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझाची घसरण सुरुच!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Tv Rating Week 33

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

बार्कचं रेटिंग पुन्हा सुरु झाल्यापासून मराठी न्यूज चॅनल्समध्ये टीआरपीचा राजा मानला जाणारा एबीपी माझा सतत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याही आठवड्यात माझा आणखी खाली घसरला आहे. त्याचवेळी जास्तीत जास्त आठवडे नंबर १ असलेला टीव्ही 9 मराठी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना मागे टाकून पुढे सरसावलेल्या झी २४ तासने सलग चार आठवडे पहिला नंबर टिकवून ठेवला आहे. मात्र, आता दोन्ही चॅनल्समधील अंतर फक्त ०.६वर असल्याने अटीतटीची स्पर्धा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जून – जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये काहीशा मंदावल्या आहेत. त्यामुळे राजकीय कव्हरेजच्या बळावर सतत पुढे असणाऱ्या चॅनल्सना त्याचा फटका बसला आहे. वेगळ्या कल्पनांसह कव्हरेज करणाऱ्या झी २४ तासने गेले चार आठवडे पुन्हा एकदा नंबर १चे स्थान पटकावले आहे. मात्र, या आठवड्यात झी २४ तास ०.६ने मागे जातानाच टीव्ही ९ मराठी ०.३ ने पुढे गेल्याने दोन्ही चॅनल्सच्या मार्केट शेअरमध्ये फक्त ०.६चे अंतर उरले आहे. एबीपी माझाची मार्केट शेअरमध्ये घसरणच सुरु आहे.

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम (आठवडा ३३वा )

१ – झी २४ तास २६.०
२ – टीव्ही ९ मराठी २५.६
३ – एबीपी माझा १८.३
४ – साम १२.९
५ – न्यूज १८ लोकमत ११.५
६ – लोकशाही ०५.७

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम

आठवडा ३३ ३२ ३१ ३० २९ २८ २७
झी २४ तास २६.० २६.५ २६.८ २६.७ २६.९ २६.३ २५.८
टीव्ही ९ मराठी २५.६ २५.३ २५.३ २५.६ २७.९ २९.१ २९.४
एबीपी माझा १८.३ १८.६ १८.८ १९.१ २०.९ २१.३ २१.६
साम १२.९ १२.९ १२.६ १२.५ १२.६ १२.२ १२.३१
न्युज १८ लोकमत ११.५ ११.२ ११.२ ११.१ ११.६ ११.२ ११.०
लोकशाही ०५.७ ०५.५ ०५.३ ५.० – – –

मराठी न्यूज चॅनल्सच्या मार्केटमध्ये काय घडलं, काय बिघडलं?

  • या वर्षाच्या ३३व्या आठवड्यात मार्केट शेअरमध्ये ०.५ टक्क्याची घट झाल्यानंतरही २६ टक्के मार्केट शेअरसह झी २४ तास नंबर १ आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावरील टीव्ही ९ मराठीचा मार्केट शेअर ०.३ने वाढून २५.६वर पोहचला आहे. त्यामुळे टीव्ही9मराठीला आपला गमावलेला पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आणखी ०.६ चा फरक ओलांडावा लागणार आहे.
  • एबीपी माझा ०.३ने कमी होत तिसऱ्या क्रमांकावर १८.३ टक्क्यांसह आहे. गेले सात आठवडे एबीपी माझाची सतत घसरण सुरु आहे. २७व्या आठवड्यातील २१.६ टक्क्यांवरून ३३व्या आठवड्यात माझाचा मार्केट शेअर १८.३वर घसरला आहे. ३.३ टक्क्यांची ही घसरण आहे.
  • साम ०.४ ची वाढ नोंदवत नोंदवत १२.६ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • न्यूज 18 लोकमत ०.४ ची वाढ नोंदवत ११.२ मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाही ३० व्या आठवड्या बार्क टीव्ही रेटिंग पुन्हा कळू लागल्यापासून किंचित वाढ नोंदवत ०५.७ मार्केट शेअरसह सहाव्या क्रमांकावर आहे.

खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील २९ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग २६, २७, २८ आणि २९ या चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असत नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.’

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:
टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?


Tags: Marathi News Channelmarathi news channels ratingtulsidas bhoiteTV9Zee 24 Taasझी २४ तासटीव्ही 9टीव्ही रेटिंगमराठी न्यूज चॅनल्समराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग
Previous Post

पेगासस हेरगिरीचा निकाल लागला: २९ पैकी ५ मोबाइलमध्ये मालवेअर, मात्र हेरगिरीचे ठोस पुरावे नाहीत!

Next Post

सोशल मीडियातील फेकची भेसळ थांबवायची आहे? जास्त काही नको, एवढंच करा…

Next Post
Social Media

सोशल मीडियातील फेकची भेसळ थांबवायची आहे? जास्त काही नको, एवढंच करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!