Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं: “कॉलेजियम व्यवस्था देशाच्या कायद्यानुसार, जबाबदारीनं बोलावं!”

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कॉलेजियम पद्धतीच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला आहे. कॉलेजियम प्रणाली हा देशाचा कायदा आहे आणि त्याचे पालन केलेच पाहिजे, असे निरीक्षण नोंदवत कोणता कायदा पाळायचा आणि कोणता नसावा हे काही लोकांना ठरवायचे असेल तर बिघाड होईल, असंही बजावलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावले आहे की, न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम प्रणाली ही कायद्यानुसार आहे. त्याविरूद्ध काही मान्यवरांच्या वक्तव्यांना समाजात चांगल्या प्रकारे घेतले जात नाही. या न्यायालयाकडून घोषित केलेला कोणताही कायदा सर्व संबंधितांना बंधनकारक आहे.

  • न्यायालयाला कायद्याची चाचणी घेण्याचा अधिकार आहे.
  • न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी गुरुवारी अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांना न्यायाधीशांच्या नियुक्तीतील विलंबावर सरकारशी वाटाघाटी करण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावण्यास सांगितले.
  • खंडपीठ म्हणाले, घटनेनुसार न्यायालय हे कायद्याचे अंतिम लवाद असावे.
  • संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे.
  • कायद्याची चाचणी घेण्याचा अधिकार न्यायालयांकडे आहे.
  • खंडपीठाने म्हटले आहे की, समाजातील काही घटक कॉलेजियमच्या विरोधात मत व्यक्त करतात, त्यामुळे देशाच्या कायद्याचा पराभव होणार नाही.
  • न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम प्रणाली मांडणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन केले जावे, असा खंडपीठाने आग्रह धरला.
  • कॉलेजियम बंधनकारक असल्याचे स्पष्टपणे नमूद करणाऱ्या घटनापीठाच्या निकालाकडे दुर्लक्ष करण्याचा परवाना सरकारला मिळू शकत नाही.
  • जेव्हा ‘निर्णय’ असतो तेव्हा इतर कोणत्याही कल्पनेला जागा नसते.

कायद्याची अंमलबजावणी थांबवाणे गरजेचे…

  • समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना संसदेने केलेले कायदे मान्य नाहीत.
  • न्यायालयाने अशा कायद्यांची अंमलबजावणी थांबवावी का?
  • समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणता कायदा पाळायचा आणि कोणता नाही हे ठरवू लागला तर, ‘ब्रेकडाउन’ची परिस्थिती निर्माण होईल.

सर्वोच्च न्यायालयाकडे १४६ शिफारसी प्रलंबित!

  • कॉलेजियम स्तरावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नावे नाकारण्याचे प्रमाण २५ टक्के आहे.
  • ३० नोव्हेंबरपर्यंत उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या ११०८ आहे.
  • आता ७७६ न्यायाधीश असून ३३२ पदे रिक्त आहेत.
  • उच्च न्यायालयाने १४६ (४४%) शिफारसी केल्या आहेत.
  • जी सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहेत.
  • उर्वरित १८६ (५६%) रिक्त पदांसाठी उच्च न्यायालयाला शिफारसी आवश्यक आहेत.
  • सरकारकडे असलेल्या ११८ प्रस्तावांपैकी ८ प्रस्तावांची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली होती.
  • कॉलेजियमने ३० प्रस्ताव फेटाळले होते, जे उच्च न्यायालयात पाठवायचे होते.
  • हायकोर्टला कॉलेजियमकडून अलीकडेच ८० नवीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

उर्वरित ५६ प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने फेटाळले!

  • १ डिसेंबर २०२२ ते ३१ मे २०२३ या कालावधीत उच्च न्यायालयाचे ४३ न्यायाधीश निवृत्त होणार असल्याची माहिती केंद्राने दिली.
  • मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार, हायकोर्ट कॉलेजियमने रिक्त पद होण्यापूर्वी किमान सहा महिने आधी शिफारस करावी लागते.
  • १ डिसेंबर रोजी, विविध उच्च न्यायालयांनी एकूण २२९ रिक्त पदांसाठी शिफारसी करायच्या होत्या.
  • या २९९ रिक्त पदांसाठी अद्याप कोणतीही शिफारस प्राप्त झालेली नाही.
  • चालू कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये, उच्च न्यायालयाला केलेल्या २२१ शिफारसींपैकी १६५ नियुक्त्या करण्यात आल्या.
  • उर्वरित ५६ प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने फेटाळले.

Tags: Collegium SystemSupreme CourtSupreme Court Collegiumकॉलेजियमसर्वोच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालय कॉलेजियम
Previous Post

भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्यास शिक्षण खात्याची ईच्छाशक्ती नाही, शिक्षण आयुक्तां विरोधात तक्रार दाखल

Next Post

नागपूर अधिवेशनात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

Next Post
Nagpur Vichan Bhavan

नागपूर अधिवेशनात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!