मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मध्य प्रदेश सरकारला १७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने १७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने मध्य प्रदेश सरकारला एसआयटीची एक टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
१७ वर्षांपूर्वी दाखल केली होती मुलासाठी याचिका!
- राज्य सरकारला पुढील तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
- तपासाचा अहवालही न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.
- आयजीच्या देखरेखीखाली तपास होईल.
- या प्रकरणी याचिकाकर्त्याने १७ वर्षांपूर्वी आपल्या हरवलेल्या मुलासाठी याचिका दाखल केली होती.
- शेवटचा अहवाल जो पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे तो फक्त कागदी आहे.
- शेजारच्या गावांमध्ये शोध घेण्यासाठी शोध वॉरंट जारी केले गेले आहेत.
- या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने चालला आहे तो समाधानकारक म्हणता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.