Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपालांनी आघाडीच्या काळात १२ आमदार रोखले, आता पुन्हा रखडले!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court 2

मुक्तपीठ टीम

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न गाजतोय. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरमध्ये घेण्याचं निश्चित केलं आहे. तोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदार नियुक्तीसंदर्भात कोणतेही पावलं उचलू नयेत तसेच राज्य सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

पुढील सुनावणी नोव्हेंबरला-

  • मुंबई उच्च न्यायालयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जनहित याचिका करणारे नाशिकमधील रतन सोली लुथ यांनी उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
  • त्यांच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफव न्यायमर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी सुरु आहे.
  • सुनावणीत राज्यपालांनी त्यांची बाजू न मांडल्यानं सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.
  • राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • आता पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम!!

  • महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात केली जात होती.
  • महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ आमदारांच्या यादीचा मुद्दा राज्यपालांनी मुद्दामून प्रलंबित ठेवला, अशी टीकाही करण्यात आली होती.
  • दरम्यान, शिंदे-भाजपा सरकार आल्यानंतर १२ आमदारांच्या नियुक्तीवर तातडीने निर्णय घेण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आलेला होता.
    यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
  • मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आलीय.

Tags: governer bhagat singh koshyariMaharashtraMLAsSupreme Courtआमदारमहाराष्ट्रमहाविकास आघाडीराज्यपाल भगतसिंग कोश्यारीशिंदे-फडणवीस सरकारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या २६ गावांना पुनर्वसनाचा दिलासा

Next Post

भाजपाला ठाकरेंप्रमाणेच खरंच शिंदेंही नकोसे?

Next Post
Prakash ambedkar (2)

भाजपाला ठाकरेंप्रमाणेच खरंच शिंदेंही नकोसे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!