Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाला ठाकरेंप्रमाणेच खरंच शिंदेंही नकोसे?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Prakash ambedkar (2)

मुक्तपीठ टीम

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेच्या युतीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजपाला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे नको होते, त्याच पध्दतीनं एकनाथ शिंदेसुद्धा त्यांना नको असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

  • सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही.
  • ही काही गादीची लढाई नाही.
  • मतदार हा राजा आहे.
  • त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल.
  • तो निर्णय आनंदानं स्विकारावा असेही आंबेडकर म्हणाले.
  • ज्याप्रमाणे भाजपाला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत.
  • हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे.
  • त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकीत आमची वेट आणि वॉचच्या भूमिका!!

  • अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात ते म्हणाले की, या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत.
  • ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे.
  • या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही.
  • आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नाही.
  • सर्वोच्च न्यायालयाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत.
  • त्याचं काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती.

युतीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांचं महत्वाचं विधान-

  • युतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पहिलं प्राध्यान कोणाला हा विषय नाही.
  • आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले होते की, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करु, या भूमिकेला कोणी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
  • जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

Tags: BJPCm Eknath ShindeCongressPrakash AmbedkarShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेकाँग्रेसप्रकाश आंबेडकरभाजपामुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेना
Previous Post

राज्यपालांनी आघाडीच्या काळात १२ आमदार रोखले, आता पुन्हा रखडले!

Next Post

वाचनाच्या माध्यमातून माणूस संस्कारक्षम बनविण्याचे काम

Next Post
Reading Inspiration Day

वाचनाच्या माध्यमातून माणूस संस्कारक्षम बनविण्याचे काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!