Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडी प्रमुखांच्या मुदतवाढीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) प्रमुख संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारकडून १० दिवसांत उत्तर मागवले आहे. गेल्या वर्षी, न्यायालयाने आपल्या एका निर्णयात केवळ दुर्मिळ प्रकरणांमध्येच केले जाईल असे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये संचालकांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढविणाऱ्या सुधारित कायद्याला आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने आठ याचिकांच्या प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला आणि जया ठाकूर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनीही याचिका दाखल केल्या आहेत. याप्रकरणी अधिवक्ता एमएल शर्मा यांनी पहिली याचिका दाखल केली होती. याचिकांमध्ये अध्यादेश असंवैधानिक घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.

यापूर्वी, सप्टेंबर २०२१ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने संजय मिश्रा यांना आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगितले होते, परंतु नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांचा कार्यकाळ आणखी एक वर्ष वाढवण्यात आला होता. याचवेळी याचिकाकर्त्यांचे वकील मनोहर लाल शर्मा यांनी म्हटले होते की, हा दुरुस्ती अध्यादेश लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेविना मंजूर करण्यात आला आहे. हे पूर्णपणे असंवैधानिक आहे.

कोण आहेत संजय कुमार मिश्रा

  • अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा हे भारतीय महसूल सेवेचे १९८४ च्या बॅचचे आयकर विभाग केडरचे अधिकारी आहेत.
  • १७ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांची मुदत केंद्र सरकारने १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाढवली होती.
  • केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआय संचालकांच्या नियुक्त्या ५ वर्षे टिकण्यासाठी अध्यादेश आणला होता.

Tags: (ईडी) प्रमुख संचालक संजय कुमार मिश्राcentral govtEd ChiefED Chief Sanjay Kumar MishraSupreme Courtईडी प्रमुखकेंद्र सरकारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

जनतेच्या जीवनात सुख-समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : गुरुवारी सकाळी न्यायालय उघडताच सुनावणी!

Next Post
maharashtra political crisis how many cases in supreme court?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : गुरुवारी सकाळी न्यायालय उघडताच सुनावणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!