Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जनतेच्या जीवनात सुख-समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे

August 3, 2022
in सरकारी बातम्या
0
Pne_dio news CM Jejuri Khandoba Darshan_2 Aug 2022-2

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले.  राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊदे, राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे. राज्यातील जनता सुखी होऊ दे, असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जेजुरी देवस्थान परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. देवस्थान परिसराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जेजुरी गडाचे जतन व संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.

दर्शन घेतल्यानंतर श्री खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी येथील मंदिराचा कलशपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी विश्वस्त तुषार शहाणे, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडे, संदीप जगताप, अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून  फुरसुंगी-ऊरूळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची केली पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवेली तालुक्यातील तुकाई टेकडी येथे फुरसुंगी-ऊरूळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पुणे मनपाचे पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली.


Tags: Cm Eknath ShindeJejuri TempleKhandoba Devasthanपाणी पुरवठा योजनाफुरसुंगी-ऊरूळी देवमुख्यमंत्री एकनाथ शिंदेश्री खंडोबाराय
Previous Post

विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

ईडी प्रमुखांच्या मुदतवाढीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस!

Next Post
Supreme Court

ईडी प्रमुखांच्या मुदतवाढीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!