Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता सर्वोच्च न्यायालय सवर्ण आरक्षणाची संवैधानिक वैधता तपासणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणेजच ईडब्ल्यूएस वर्गातील १०% आरक्षणाची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, मुस्लिमांना आरक्षण देणारा स्थानिक कायदा रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना ते परवानगी देईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षण देण्याच्या केंद्राच्या निर्णयाची घटनात्मक वैधता तपासेल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर न्यायालयाचे घटनापीठ १३ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू करणार आहे.

सर्वोच्च न्यायालय अन्य याचिकांवरही सुनावणी करणार!

  • सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारच्या याचिका आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अन्य याचिकांवर सुनावणी करणार आहे.
  • आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने मुस्लिमांना आरक्षण देणारा स्थानिक कायदा रद्द केला होता.
  • आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने चार न्यायाधीशांच्या निकालात या तरतुदी ‘स्टेट टू मुस्लिम कम्युनिटीज अ‍ॅक्ट’ २००५ अंतर्गत घटनाबाह्य घोषित केल्या.
  • घटनापीठाने शादान फरासात, नचिकेता जोशी, महफूज नजकी आणि कानू अग्रवाल या चार वकिलांना नोडल वकील म्हणून काम करण्यास सांगितले.

मुख्य न्यायमूर्ती उदय उमेश ललित, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने सांगितले की, ते प्रक्रियात्मक पैलू आणि इतर तपशीलांवर ६ सप्टेंबरला निर्णय घेईल आणि १३ सप्टेंबरपासून याचिकांवर सुनावणी करेल. केंद्राने १०३ व्या घटनादुरुस्ती कायदा २०१९द्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रवेश आणि सार्वजनिक सेवांमध्ये आरक्षणाची तरतूद जोडली आहे.


Tags: constitutional validityewsSupreme Courtसर्वोच्च न्यायालयसवर्ण आरक्षण
Previous Post

महाराष्ट्रातील डॉक्टर-कंपाउंडर आता राष्ट्रीय राजकारणात!

Next Post

राज्यात १४४४ नवे रुग्ण, २००६ बरे! मुंबई ५१६, नाशिक ११, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात १४४४ नवे रुग्ण, २००६ बरे! मुंबई ५१६, नाशिक ११, नागपूर २ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!