Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात ११७ कोटींचा जीएसटी घोटाळा, स्टिल कंपनीच्या संचालकास अटक

July 21, 2022
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra GSt

मुक्तपीठ टीम

खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या  करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त करुन १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी आज अटक केली आहे.            

सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी मे. पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ९९.२७ कोटी रुपयांची खोटी खरेदीची बिजके प्राप्त केली आहेत. त्यातून या व्यक्तीने शासनाची सुमारे १७.८७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे.  या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.            

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी डॉ. विद्याधर जगताप, सहाय्यक राज्यकर आयुक्त हे मोहन चिखले, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी  अनिल भंडारी (भा.प्र.से), सहआयुक्त, अन्वेषण-क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यवाहीसाठी प्रशांत खराडे आणि  श्रीकांत पवार या सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि इतर राज्यकर निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या अटकेसह आर्थिक वर्षातील सलग २८ अटक कारवाया महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने केल्या आहेत.


Tags: GST ScamMaharashtraजीएसटी घोटाळामहाराष्ट्रसय्यद तैकीर हसन रिजवी
Previous Post

कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला गती द्या – ॲड. राहुल नार्वेकर

Next Post

जय शाह, सौरभ गांगुली मुदतवाढीसाठी BCCI घटनादुरुस्ती! सुनावणी पुढे ढकलली! जाणून घ्या काय आहे प्रकरण…

Next Post
jay Shah And Sourav Gangully

जय शाह, सौरभ गांगुली मुदतवाढीसाठी BCCI घटनादुरुस्ती! सुनावणी पुढे ढकलली! जाणून घ्या काय आहे प्रकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!