Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रख्यात मणिपुरी नृत्यांगना सविता बेन मेहता यांचा व्यक्तिगत संग्रह भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात समाविष्ट

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Savita Ben Mehta

मुक्तपीठ टीम

मणिपुरी नृत्यशैलीच्या प्रख्यात नृत्यांगना सविता बेन मेहता यांच्या व्यक्तिगत संग्रहातील ‘होम मूव्हीज’ चा विपुल संग्रह आता NFAI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात समाविष्ट झाला आहे. २ मिमी आणि सुपर 8 मिमी प्रकारच्या पटांचा हा संग्रह आहे. हा प्रकार खासगी पटांच्या चित्रणासाठी म्हणजेच होम मूव्हीजसाठी वापरला जातो. कोडाक्रोम आणि कोडाक्रोम II मधील होम मूव्हीजचा हा व्यक्तिगत संग्रह, सामाजिक दस्तैवजांच्या जपणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने NFAI ने तो अधिग्रहित केला आहे. कोडाक्रोम आणि कोडाक्रोम II अनुक्रमे १९३५ आणि १९६१ मध्ये विशेषतः हौशी व्यक्तींच्या वापरासाठी प्रचलित झाले. यापैकी कोडाक्रोम II ही, कोडाक्रोमपेक्षा अधिक वरचढ आवृत्ती आहे.

 

मणिपुरी नृत्यशैली भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील शृंगारिक भावबंधांचे दर्शन घडविते. सुंदर, आकर्षक वस्त्रालंकार, हावभाव आणि नाजूक सुकुमार हालचाली हे या नृत्यशैलीचे वैशिष्ट्य. या शैलीच्या अद्वितीय नृत्यांगना सविता बेन मेहता यांनी हा नृत्यशैलीला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. मणिपुरी नृत्यशैलीतील सर्वोच्च पात्रता आणि सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता आणि शिक्षण बडोद्याच्या आर्य कन्या विद्यालयात. दिग्दर्शिका आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून बॅले शैलीच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

 

“८ मिमी पटांचा इतका महत्त्वपूर्ण संग्रह मिळाल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. NFAI च्या दृष्टीने एका अत्यंत दुर्मिळ संग्रहाची भर पडली आहे. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये ८ मिमी आणि सुपर ८ मिमी पट व्यापक स्तरावर प्रचलित होते. या संग्रहामध्ये त्यांच्या नृत्याच्या सादरीकरणांबरोबरच ईशान्य भारतातील चित्रणे असण्याची शक्यता आहे. या पटांचे लवकरच डिजिटायझेशन केले जाईल. सविताबेन मेहता यांचे पुतणे- उद्योजक जय मेहता यांच्या कुटुंबीयांचा मी ऋणी आहे.”- अशा शब्दांत NFAI चे संचालक प्रकाश मगदूम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सविताबेन मेहता या अनेक भाषांमध्ये पारंगत होत्या. सदर चित्रणांमध्ये त्यांचे मणिपूरमध्ये प्रचलित मीती भाषेतील हस्ताक्षरही बघावयास मिळते.

 

सुप्रसिद्ध कलासंग्राहक दीप्ती शशिधरन (‘एका अर्काईव्हींग सर्व्हिसेस’ च्या संचालिका) आणि रॅशेल नोरोन्हा यांच्या प्रयत्नांतून हा संग्रह NFAI ला प्रदान करण्यात आला.


Tags: good newsIndian National Film MuseumManipuri DancermuktpeethPersonal CollectionSavita Ben Mehtaचांगली बातमीभारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयमणिपुरी नृत्यांगनामुक्तपीठव्यक्तिगत संग्रहसविता बेन मेहता
Previous Post

मराठवाड्यात २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या पहिल्या प्रकल्पासाठी ३७ कोटी!

Next Post

नाशिकमध्ये भारतीय हवाई दलात ८० अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
INDIANAIRFORCE

नाशिकमध्ये भारतीय हवाई दलात ८० अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!