Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साठ्ये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पुज्यते’ महोत्सव २२ फेब्रुवारी रोजी सुरु होणार

February 20, 2022
in घडलं-बिघडलं
0
sathye college organised Vigyan sarvatra Pujyate programme

मुक्तपीठ टीम

गणित, विज्ञान या विषयांबद्दल फारशी आस्था नसलेले विद्यार्थी आणि यात रुची नसलेल्या पालकांनाही ‘विज्ञाना’विषयी भरपूर ‘ज्ञान’ नक्कीच मिळेल, असा ‘विज्ञान सर्वत्र पुज्यते’ महोत्सव मंगळवारी, २२ फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात हा अनोखा महोत्सव आयोजिण्यात आहे. विज्ञान प्रसारची सहयोगी संस्था म्हणून साठ्ये महाविद्यालयाची या महोत्सवाच्या आयोजनाकरिता निवड झाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी पत्रकारांना शनिवारी येथे दिली.

 

‘मेंदूला ज्ञानाचा खुराक’ मिळणारे विज्ञानविषयक चित्रपट, नाटके, एकांकिका, व्याख्याने, स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची लयलूट या अनोख्या महोत्सवात आहे, आयोजनाची जबाबदारी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या विज्ञान प्रसार या स्वायत्त संस्थेकडे सोपविली आहे.

 

महाविद्यालयाच्या वेबसाइटवर या कार्यक्रमाचे संपूर्ण आठवडाभराचे वेळापत्रक आणि त्यांतील प्रवेशासाठी नोंदणीची व्यवस्था आहे. विज्ञानप्रसाराला एकाच वेळी मोठी चालना देण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागारांचे कार्यालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांचाही मोलाचा सहभाग आहे.

 

याचे निमित्त आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे ! गेल्या २० वर्षांपासून भारताने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. त्याची ख्याती परदेशांतील शास्त्रज्ञांपर्यंतही पोहचली. या क्षेत्रातील विविध अवघड टप्पे अनेक शास्त्रज्ञ, महाविद्यालयीन- शालेय शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सोप्या शब्दांत लिलया उलगडले. त्यामुळेच भारतीय विज्ञानातील प्रगतीचे दर्शन घडविणा-या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष पेडणेकर यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता साठ्ये महाविद्यालयात होणार आहे. टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) तज्ज्ञांद्वारे ‘घर नावाची प्रयोगशाळा ’ या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही त्याच दिवशी केले आहे आणि  सायंकाळी ५ वाजता प्रसाद वनारसे यांचा ‘डार्विन’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्यानंतर विविध कार्यक्रम पुढील आठवडाभर होतील. हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. मात्र, कोविड निर्बंध लक्षात घेता आगाऊ नोंदणीनेच प्रवेश देण्यात येतील, असे डॉ. राजवाडे यांनी स्पष्ट केले.

 

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचाही यात सहभाग आहे. देशातील ७५ शहरांत एकाच वेळी ७५ विविध प्रकारचे वैज्ञानिक कार्यक्रम होतील. या अमृतमहोत्सवी सोहळ्यात संरक्षण, अवकाश, आरोग्य, कृषी, खगोलशास्त्र आणि भारताची शास्त्रीय महत्ता व तांत्रिक क्षमता यांचे दर्शन देशवासियांना घडणार आहे. आठवडाभरात व्याख्याने, चर्चासत्रे, चित्रपट, नाटक, पुस्तक प्रदर्शने, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा अशा विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचा सहभाग यात आहे.
महाविद्यालयाने निबंध लेखनापासून प्रकल्प सादरीकरणापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या नऊ स्पर्धांचे आयोजन केले. त्याचा पारितोषिक वितरण महोत्सवाच्या समारोप समारंभात २८ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता  रोजी होईल.


Tags: Sathaye Collegeडॉ. माधव राजवाडेविज्ञान सर्वत्र पुज्यतेसाठ्ये महाविद्यालय
Previous Post

हरियाणातील कर्नालमध्येही शिवजयंती उत्साहात, महाराजांच्या जयघोषानं दुमदुमला आसमंत!

Next Post

केंद्रीय मंत्र्यांनीही केली हेमामालिनींच्या गालांशी रस्त्याची तुलना! भाजपा नेते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार : सचिन सावंत

Next Post
Sachin Sawant Heema Malini faggan Singh Kulaste

केंद्रीय मंत्र्यांनीही केली हेमामालिनींच्या गालांशी रस्त्याची तुलना! भाजपा नेते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार : सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!