Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्र्यांनीही केली हेमामालिनींच्या गालांशी रस्त्याची तुलना! भाजपा नेते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार : सचिन सावंत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sachin Sawant Heema Malini faggan Singh Kulaste

मुक्तपीठ टीम

मोदी सरकारचे मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी अभिनेत्री व भाजपा खासदार हेमामालिनी यांच्या गालाशी रस्त्यांची केलेली तुलना निषेधार्ह आहे. महिलाबाबत अशा प्रकारची भाषा कोणीही वापरू नये. महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी हेच शब्द हेमामालिनींबद्दल वापरले तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी बोंब ठोकणारे भाजपा नेते गप्प का? महिलांच्या बाबतीत भाजपाची भूमिका दुटप्पी असून भाजपामध्ये भाजपाच्याच महिला नेत्यांचा सन्मान ठेवला जात नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे

सावंत पुढे म्हणाले की, भाजपा खासदार हेमामालिनी व महिलांबदद्ल कोणीही अशी भाषा वापरणे निषेधार्ह आहे. मोदी सरकारने महिला अत्याचारांच्या विरोधात भूमिका घेऊ असे अभिवचन दिले होते. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एक केंद्रीय मंत्री भाजपाच्याच महिला खासदारांबद्दल असे बोलतो हे गंभीर आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या व्याख्येनुसार भाजपाच्या नेत्याने भाजपाच्याच महिला खासदाराचा विनयभंग केला आहे. वाघ यांनी यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तसेच गाल पाहणा-याचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही म्हटले होते. गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही केली होती. आता ही मंडळी चिडीचूप आहेत.

भाजपा नेत्यांनी आता कुलस्ते यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुन्हा दाखल करण्यासाठी आवाहन करावे, अशी मागणी सावंत यांनी केली. शिवाजी महाराजांचा रांजाच्या पाटलांबद्दलचा दाखलाही त्यांनी दिला होता. आज शिवजयंती आहे, भाजपा नेत्यांना खरेच महिलांबाबत काही वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या खासदारांबदद्ल त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याने केलेल्या विधानाबदद्ल त्यांना संताप यायला हवा. अपेक्षा आहे की भाजपा नेते हेमामालीनींच्या या विनयभंगाबदद्ल तातडीने कारवाईची मागणी करतील‌‌. त्यांना नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भीती वाटत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

फग्गनसिंह कुलस्ते यांनी हेमामालीनींबाबत त्याच पठडीतील वक्तव्य केले आहे जे गुलाबराव पाटील यांनी केले होते. महाराष्ट्र पोलिसांना विनयभंग दिसत नाही का असा सवाल भाजपा नेत्यांनी केला होता मग आता तुम्हाला त्याच वक्तव्याबद्दल विनयभंग झाल्याचे दिसत नाही का? विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाईची सिलेक्टिव्ह मागणी करणे चुकीचे आहे. कोणीही असो महिलांचा आदर राखला गेला पाहिजे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणेच मोदी सरकारचे मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनीही माफी मागितली पाहिजे. हेमामालिनी महाराष्ट्राच्या रहिवाशी असल्याने राज्य महिला आयोग त्याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे, असे सावंत म्हणाले.


Tags: Heema Malinisachin sawantकाँग्रेसफग्गन सिंह कुलस्तेभाजपासचिन सावंतहेमा मालिनी
Previous Post

साठ्ये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पुज्यते’ महोत्सव २२ फेब्रुवारी रोजी सुरु होणार

Next Post

‘ते’ अण्णा नकोच! पण तुमच्यातून नवे अण्णा का नाही घडवत?

Next Post
ANNA HAZARE

'ते' अण्णा नकोच! पण तुमच्यातून नवे अण्णा का नाही घडवत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!