Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

कुस्ती, हलगी व मर्दानी खेळांच्या कोल्हापूरी परंपरेने ‘भारत जोडो’ यात्रेचे आगळेवेगळे स्वागत

November 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
kolhapur photo 5

मुक्तपीठ टीम

लाल मातीत सजलेल्या कुस्तीच्या आखाड्यात, कसलेल्या मजबूत शरीरयष्टीचे कोल्हापुरी पैलवान अंगाला तेल लावून उभे ठाकले होते. बाजूला उभ्या असलेल्या वस्तादानी हात उंचावून इशारा करताच सलामी झडली, नजरेला नजर भिडली आणि एकच झटपट सुरू झाली. कोणी एकेरी पट काढत तर कोणी समोरच्याचा तोल जोखत कुस्ती लागली. एकमेकांवर तुटून पडले होते…. आणि त्यांना चेतवण्यासाठी प्रेक्षकांच्या शिट्ट्या… आरोळ्या, हुंकाराने वातावरण नुसतं भरून गेले होते. हा कुस्तीचा खराखुरा फड रंगला होता शेळोली, कळमनुरीच्या रस्त्यावर. तर या कुस्तीसाठी खास प्रेक्षक होते ते खुद्द राहुलजी गांधी, ते कुस्ती औत्सुक्याने न्याहाळत होते.

kolhapur photo 000

काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी अख्खे कोल्हापूरच आज कळमनूरीच्या रस्त्यावर उतरवले होते. कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध प्रतिकांना त्यांनी भारत जोडो यात्रेशी जोडले होते. त्यांची सखोल माहिती घेत, आपुलकीने चौकशी करत राहुलजींनी कोल्हापूरकरांच्या रांगड्या अभिवादानाचा स्वीकार केला.

kolhapur photo 8

लाल मातीच्या आखाड्यात कुस्ती रंगली होती. त्याच्या पुढे हलगीचा कडकडाट होता आणि त्याच तालावर लेझीम पथकाने ठेका धरला. लवलवत्या पात्याच्या दांडपट्टाच्या चित्तथरारक कसरती सुरू होत्या. तर काही तरुणी लाठीकाठी या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवत होत्या. कोल्हापूरची शान समजल्या जाणाऱ्या, तुरा खोचलेल्या भगव्या फेट्यातील दहा हजार कार्यकर्त्यांची फौज नजरेच्या टप्यातही येत नव्हती.फेटयांच्या लांबच्या लांब रांगा दिसत होत्या. सगळं वातावरणच भगवामय झाले होते, अस्सल मराठीमोळी संस्कृतीचे दर्शन राहुलजींना घडवत कोल्हापूरकरांनी भारत जोडो यात्रेचे जोरदार स्वागत केले.

kolhapur photo 7

या संयोजनाबाबत बोलताना माजी मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, “समतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय दिला. त्यामुळेच कुस्ती जगभरात पोहोचली. कुस्ती आणि हलगी, मर्दानी खेळ ही कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा दर्शवत आम्ही राहुलजींच्या भारत जोडो यात्रेचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. ही यात्रा जातीधर्मातील भेद, द्वेष मिटवून सर्वांना प्रेमाने एकत्र आणणारी आहे. या यात्रेचा उद्देश नक्कीच सफल होईल, अशी माझी खात्री आहे.”


Tags: Bharat Jodo YatraKolhapurMaharashtrarahul gandhiभारत जोडो यात्राराहुल गांधी
Previous Post

माणुसकेंद्री, सकारात्मक व आश्वासक पत्रकारितेची गरज – विजय कुवळेकर

Next Post

भारतातील सर्वोत्तम नियोक्ता म्हणून फोर्ब्सने रिलायन्स कंपनीची केली घोषणा! जागतिक स्तरावर २०वा क्रमांक

Next Post
Reliance Forbes

भारतातील सर्वोत्तम नियोक्ता म्हणून फोर्ब्सने रिलायन्स कंपनीची केली घोषणा! जागतिक स्तरावर २०वा क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!