Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माणुसकेंद्री, सकारात्मक व आश्वासक पत्रकारितेची गरज – विजय कुवळेकर

महावीरभाई जोंधळे यांच्या 'गवतात उगवलेली अक्षरं' आत्मकहाणीचे प्रकाशन

November 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
Manovikas 3

मुक्तपीठ टीम

“मानवतावाद हा पत्रकारितेचा गाभा असायला हवा. मात्र, आज बाजारीकरण, उथळपणाला अधिक महत्व दिले जात आहे. परिणामी, माध्यमांवरची विश्वासाहर्ता कमी होत आहे. सामान्य माणसाचा, दुःखितांचा, कष्टकऱ्यांचा कळवळा माध्यमांना असला पाहिजे. माणूसकेंद्री, सकारात्मक व आश्वासक पत्रकारितेची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय कुवळेकर यांनी केले.

मनोविकास प्रकाशनातर्फे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार महावीरभाई जोंधळे यांच्या ‘गवतात उगवलेली अक्षरं’ या  आत्मकहाणीचे प्रकाशन कुवळेकर यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरविंद गोखले, पत्रकार विजय चोरमारे, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, सौ. इंदुमती जोंधळे उपस्थित होते.

विजय कुवळेकर म्हणाले, “पत्रकार हा लेखक असायला हवा. ललितलेखनाची गोडी असेल, तर चाकोरीबाहेरचे विषय आपल्याला मांडता येतात. पुरोगामी-प्रतिगामी असा शिक्का मारून माणूस कधीच समजत नाही. विचारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. नैतिकता जपत निर्मोही व लोकानुरंजनाची पत्रकारिता व्हावी. लढवय्यी वृत्ती न सोडता नव्यातील चांगले टिपून त्याचा समाजहितासाठी उपयोग कसा करता येईल, याचा विचार पत्रकार, लेखकांनी करायला हवा.”

महावीर जोंधळे म्हणाले, “वेगवेगळ्या विचारांच्या लोकांचा संवाद महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र फिरताना, अबाल वृद्धांशी बोलताना प्रेम वाटण्याची गरज आहे. द्वेषाचे राजकारण, जातीधर्मातील भेदाभेद यामुळे समाजात विभागणी झाली आहे.  द्वेष, शत्रुत्व, मत्सर घालवण्यासाठी प्रेम, वात्सल्याची भावना निर्माण करण्याची गरज वाटते. पत्रकाराकडे विचार असला पाहिजे. जनसामान्यांच्या प्रश्नाचा आरसा म्हणून पत्रकारांनी काम करावे. तुच्छतावादाच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. व्हॉट्सअप विद्यापीठाच्या जमान्यात आपण जबाबदारीचे भान राखले पाहिजे.”

विजय चोरमारे म्हणाले, “पत्रकारितेला भांडवली स्वरूप प्राप्त झाले आहे. तत्वनिष्ठ पत्रकारिता संग्रहालयात ठेवावी, अशी आजची स्थिती आहे. अलीकडच्या काळात बाजारव्यवस्थेशी तडजोड करून काम करण्याची वेळ संपादकांवर आली आहे. माध्यमे प्रबोधनाचे काम करतात की मार्केटिंगचे हेच कळत नाही. आज वार्तामूल्य हरवलेल्या काळात छोटी माणसे मोठी करून दाखवली जातात. पत्रकारितेतील उपक्रमशीलतेचे बाजारीकरण दुर्दैवी आहे. जोंधळे यांच्या पुस्तकातून पत्रकारितेचा इतिहास गुणदोषांसाहित अधोरेखित झाला आहे.”

अरविंद गोखले म्हणाले, “पत्रकारितेला ‘गिव्ह अँड टेक’ची सवय लागली आहे. स्पष्टपणे लिहिणाऱ्या पत्रकारांची वानवा आहे. समाजाच्या हितासाठी चांगले आणि स्पष्ट लिहिण्याची गरज आहे. कटुता येण्याच्या भीतीने अनेकजण लिहिण्याचे टाळतात.”

अरविंद पाटकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. आसावरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.


Previous Post

कोलकाताचा श्लोक मुखर्जी ठरला डूडल फॉर गुगल २०२२ आर्टवर्क स्पर्धेचा मानकरी!

Next Post

कुस्ती, हलगी व मर्दानी खेळांच्या कोल्हापूरी परंपरेने ‘भारत जोडो’ यात्रेचे आगळेवेगळे स्वागत

Next Post
kolhapur photo 5

कुस्ती, हलगी व मर्दानी खेळांच्या कोल्हापूरी परंपरेने ‘भारत जोडो’ यात्रेचे आगळेवेगळे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!